New Delhi Railway Station Stampede Updates : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीत १८ प्रवाशांचा मृत्यू, दुर्घटनेचे कारण आले समोर

New Delhi Railway Station stampede : प्लॅटफॉर्म क्रमांक १२ आणि १४ वर लोक आपापल्या गाड्यांमध्ये चढण्यासाठी धावत असताना चेंगराचेंगरी झाली. एस्केलेटरवरील धक्क्यामुळे काही प्रवासी, बहुतेक महिला आणि मुले चिरडले गेले.
New Delhi Railway Station Stampede Updates : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीत १८ प्रवाशांचा मृत्यू, दुर्घटनेचे कारण आले समोर
Updated on

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर शनिवारी रात्री चेंगराचेंगरी झाली यात १८ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. ही घटना रात्री १० वाजताच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक १३ आणि १४ वर घडली. प्रयागराज महाकुंभाला जाण्यासाठी हजारो भाविक स्टेशनवर जमले होते आणि ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते, यादरम्यान चेंगराचेंगरी झाली. घटनेची माहिती मिळताच दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना आणि माजी मुख्यमंत्री आतिशी जखमींची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com