esakal | New Delhi : औद्योगिक उत्पादनात तेजीचे वारे
sakal

बोलून बातमी शोधा

new delhi

New Delhi : औद्योगिक उत्पादनात तेजीचे वारे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतातील औद्योगिक उत्पादन जुलैमध्ये ११.५ टक्क्यांनी वाढल्याची माहिती राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने आज दिली. उत्पादन, खाण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जुलै महिन्यातील औद्योगिक निर्देशांक जारी केला आहे. गेल्या वर्षी जुलै २०२० मध्ये औद्योगिक उत्पादनात १०.५० टक्के घट नोंदवण्यात आली होती. नोंदवण्यात आली आहे. जून महिन्यात ही वाढ ५.७ टक्के नोंदवण्यात आली होती. त्या तुलनेत जुलै महिन्यात उत्पादन वाढल्याचे दिसत आहे.जुलै महिन्यात उत्पादन क्षेत्रात १०.५० टक्के वाढ झाली आहे. तर खाण उत्पादनात १९.५० टक्के आणि वीज निर्मिती क्षेत्रात ११.१ टक्क्यांची वाढ झाली आहे.

यावर्षीच्या एप्रिल ते जुलै या दरम्यान औद्योगिक उत्पादनाची (आयआयपी) वाढ ३४.१ टक्के नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत ‘आयआयपी’च्या वाढीत २९.३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली होती. मार्च २०२० मध्ये करोना विषाणूच्या संसर्गामुळे औद्योगिक उत्पादनाला मोठा फटका बसला होता. त्यावेळी ‘आयआयपी’ची वाढ १८.७ टक्क्यांनी घटली होती. एप्रिल २०२० मध्ये औद्योगिक उत्पादन उणे ५७.३ टक्के होती.

आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या तिमाहीत ‘जीडीपी’त २०.१ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या वाढीमुळे देशाची आर्थिक स्थिती पुन्हा रुळावर येत असल्याचे दिसत आहे.

जुलै२०२१मध्ये ‘आयआयपी’ १३१.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. हाच निर्देषांक जुलै २०२०मध्ये ११७.९ टक्के होता.

loading image
go to top