esakal | नवीन शैक्षणिक धोरणही चीनच्या विरोधात!
sakal

बोलून बातमी शोधा

school_239.jpg

नव्या शैक्षणिक धोरणामध्ये परदेशी भाषेच्या यादीमधून चायनिज भाषेला वगळ्यात आलं आहे.

नवीन शैक्षणिक धोरणही चीनच्या विरोधात!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली- नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (2020) चीनच्या विरोधात असल्याचं कळत आहे. कारण नव्या शैक्षणिक धोरणामध्ये परदेशी भाषेच्या यादीमधून चायनिज भाषेला वगळ्यात आलं आहे. त्यामुळे माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आता परदेशी भाषा म्हणून चायनिज भाषेचा अभ्यास करता न येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी जगातील इतर भाषांचा अभ्यास करावा, त्यांची संस्कृती जाणून घ्यावी आणि आपल्या ज्ञानाची कक्षा वाढवावी यासाठी परदेशी भाषा शिकवण्यात येते. विद्यार्थी आपल्या आवडीनुसार परदेशी भाषा निवडू शकतात.  

ट्विटर हॅक करुन, 17 वर्षांच्या पोरानं एका दिवसांत कमावले 1 लाख डॉलर

मागील वर्षीच्या शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात परदेशी भाषा म्हणून चायनिज, फ्रेन्च, जर्मन, स्पॅनिश आणि जापनिज या भाषांचा समावेश करण्यात आला होता. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतिम आवृत्तीत कोरियन, पोर्तुगीज आणि थाई या भाषांचा समावेश करण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि रमेश पोखरियाल यांनी दिली होती. परदेशी भाषा म्हणून चायनिज भाषेला वगळण्यात आल्याने शालेय संस्था ही भाषा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करु शकत नाहीत का, याबाबत संभ्रम कायम आहे. 

पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जून महिन्यात रक्तरंजित संघर्ष झाला होता. यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. चीनचीही जीवितहानी झाली होती, मात्र मृत जवानांचा आकडा जाहीर करण्यास चीनने नकार दिला होता. या घटनेमुळे देशात चीनविरोधात संताप आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने जूनमध्ये 59 चिनी अॅप्सवर बंदी आणली होती. यात टिकटॉक, शेअर इट, यूसी ब्राऊझर, हॅलो यासारख्या प्रसिद्ध अॅप्सचा समावेश होता. हे अॅप्स देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांना बाधा आणत असल्याचं कारण सरकारने यामागे दिलं होतं. त्यानंतर जूलैमध्ये आणखी 47 चिनी अॅप्सवर बंदी आणली आहे. नव्याने बंदी आणण्यात आलेले अॅप्स जून्या अॅप्सचे क्लोन होते. 

देशावर ‘पर्जन्यमाया’ कायम; मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात १०४ टक्के पावसाचा अंदाज

गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये तणावाची स्थिती आहे. दोन्ही देशाचे सैन्य सीमा भागात तैनात करण्यात आले आहे. शिवाय उभय देशांनी सीमा भागात शस्त्रास्त्रांची जुळवाजुळव सुरु केली आहे. तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांनी लष्करी पातळीवर चर्चा सुरु केली आहे. मात्र, लडाखमधून सैन्य मागे घेण्यास चीन टाळाटाळ करत आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध स्फोटक बनले आहेत. 

(edited by- kartik pujari)

loading image