काश्मीरमध्ये नवं युग सुरु होणार : नरेंद्र मोदी

टीम ई-सकाळ
Thursday, 8 August 2019

- काश्मीरमधील कलम 370 हटविल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये नवं युग सुरु होणार

- काश्मीरमधील तरुणांना आता सर्व हक्क मिळणार

नवी दिल्ली : काश्मीरमधील कलम 370 हटविल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये नवं युग सुरु होणार आहे. काश्मीरमधील तरुणांना आता सर्व हक्क मिळणार आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर काश्मीरमधील हे कलम हटविण्यात आले आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश करण्यात आले आहेत. देशभरात सरकारच्या या निर्णयाचे कौतुक करण्यात येत आहे. मोदींनी याविषयी प्रथमच सार्वजनिक भाषण करत देशाला उद्देशून भाषण केले.

मोदी म्हणाले, की काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा खूप विचारपूर्वक निर्णय घेतला. कलम 370 आणि 35 ए हे आता भूतकाळ झाले आहे. काश्मीरमधील पोलिसांना आता सर्व अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. काश्मीरमधील अनेक विकासकामे वेगाने होत आहेत. काश्मीरमधील सर्व रिक्त पदे भरली जाणार आहेत. काश्मीरमध्ये उद्योग उभारणीस प्रोत्साहन देण्यात येणार आहे. काश्मीरच्या विकासाला प्राधान्य देणे हेच आमचे लक्ष्य आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New era will begin in Kashmir says PM Narendra Modi