esakal | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गाइडलाइन्स

बोलून बातमी शोधा

govt office.jpg
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गाइडलाइन्स
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांची वाढत असून केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी कामाचे तास आणि प्रत्यक्ष हजेरी याबाबत नव्या गाइडलाइन जारी केल्या आहेत. यामध्ये डेप्युटी सेक्रेटरी आणि त्या समकक्ष पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियमावली जाहीर केलीय. तसंच ही नियमावली डेप्युटी सेक्रेटरीसह त्यावरील पदांसाठीही लागू राहणार आहे. यामध्ये म्हटलं आहे की, डेप्युटी सेक्रेटरी आणि समकक्ष पद, तसंच वरील पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आधीसारखे कार्यालयात यावे लागेल.

नव्या गाइडलाइननुसार, अप्पर सचिव आणि त्याखालील पदावर 50 टक्के कर्मचाऱ्यांनाच कार्यालयात उपस्थित रहावं लागेल. अधिकाऱ्यांचे कामाचे तास अनुक्रमे सकाळी 9 ते 5.30, सकाळी 9.30 ते 6 आणि सकाळी 10 ते सांयकाळी 6.30 वाजेपर्यंत असणार आहेत.

दिव्यांग आणि गर्भवती महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्यातून सूट मिळणार आहे. पुढचा आदेश येईपर्यंत ते घरातून काम करू शकतील. कामगार राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी नियमावली ही 30 एप्रिल 2021 पर्यंत लागू राहणार आहे.

हेही वाचा: कोरोना काळात भारतविरोधी शक्तींच्या कट-कारस्थानांपासून जनतेनं सावध रहावं - RSS

केंद्रीय कर्मचाऱ्यांना नुकतंच महागाई भत्त्याबाबत दिलासा देण्यात आला होता. अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार लाभार्थ्यांना डिएचा पूर्ण फायदा 1 जुलैपासून मिळेल. डिएचे तीन हप्ते देण्यास 1 जुलै 2021 पासून सुरुवात होईल. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कोरोनामुळे गेल्या वर्षीपासून देण्यात आलेला नाही.

देशात शुक्रवारी दिवसभरात 3 लाख 46 हजार 786 नवीन रुग्ण आढळले. गेल्या चार दिवसांपासून भारतात दर दिवशी 3 लाखांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. तसंच दिवसेंदिवस मृतांचा आकडा नवा उच्चांक गाठत आहे. गेल्या 24 तासात 2 हजार 624 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 2 लाख 19 हजार 838 जण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.