दहशतवाद्यांना जिवंत पकडण्याचा नवीन मंत्र

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 मे 2018

दहशवाद्यांना जिवंत पकडण्याचा नवीन मंत्र, जम्मू-काश्मिर मधील सुरक्षा दलांना देण्यात आला आहे. मागील सात महिन्यात 70 दहशतवादी पोलिस चकमकीत मारले गेले आहेत. दहशवादी संघटनांमध्ये नव्याने सामिल होणाऱ्या युवकांचा शोध घेऊन त्यांचे मनपरिवर्न करून त्यांना परत कुटुंबामध्ये जाण्याची प्रेरणा देण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यासाठी पोलिस आणि सुरक्षा दलांकडून ओवरग्राऊंड कार्यकर्त्यांचे जाळे तयार करण्यात यणार आहे. या माध्यमातून दहशतवादाकडे आकृष्ठ करणाऱ्यांपासून या तरुणांची नाळ तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे.   

श्रीनगर : दहशवाद्यांना जिवंत पकडण्याचा नवीन मंत्र, जम्मू-काश्मिर मधील सुरक्षा दलांना देण्यात आला आहे. मागील सात महिन्यात 70 दहशतवादी पोलिस चकमकीत मारले गेले आहेत. दहशवादी संघटनांमध्ये नव्याने सामिल होणाऱ्या युवकांचा शोध घेऊन त्यांचे मनपरिवर्न करून त्यांना परत कुटुंबामध्ये जाण्याची प्रेरणा देण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यासाठी पोलिस आणि सुरक्षा दलांकडून ओवरग्राऊंड कार्यकर्त्यांचे जाळे तयार करण्यात यणार आहे. या माध्यमातून दहशतवादाकडे आकृष्ठ करणाऱ्यांपासून या तरुणांची नाळ तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे.   

"आमचा प्रयत्न या तरुणांना जिवंत पकडून त्यांच्या तक्रारी समजून घेणे असा आहे. 15 किंवा 16 वर्षांच्या मुलांचे ब्रेनवॉश करुन त्यांच्या हातात बुंदुका दिल्या जात आहेत. अशी मुले पोलिस चकमकीत मारली जाऊ नयेत यासाठी त्यांना प्रेरणा देण्याची गरज आहे." असे मत फुटीरतावादी विरोधी मोहीमेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.   

रमझानच्या दरम्यान कोणतेही ऑपरेशन सुरू करू नये असे केंद्र सरकारने सुरक्षा दलांना सागितले आहे. परंतु, सद्दाम पादर, एस. फाझील, समीर टायगर सारख्या दहशवाद्यांना येथून दूर करण्याची गरज आहे. हे दहशतवादी या तरुण मुलांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात. त्यांना लष्कर-ए-तोयबा, जेश-ए-महोम्मद आणि हिजबुल-मुजाहदीन सारख्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनामध्ये पाठवतात. गुप्तचर यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार हे ऑपरेशन सुरुच राहणार आहे. परंतु, नव्याने भरती करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यावर जास्त भर देण्यात येईल.
या कामासाठी काही पालकसुद्धा आम्हाला संपर्क साधत आहेत. एकमेकांमधील द्वेष, मतभेद विसरून या मुलांच्य हातात पुन्हा पुस्तके आणि इतर आवश्यक सुविधा पुरविण्यात येतील. असेही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने म्हणाले.

"मागील सात महिन्या चार नवीन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यातील एक कायमचा परत आला आहे. अशी माहिती काश्मिर रेंजचे पोलिस महासंचालक स्वयमं प्रकाश पानी यांनी दिली."
पानी म्हणाले, " पोलिस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी या तरुणांना परत येण्याचे आवाहन केले होते. आम्हीही त्यांना तेच सांगत आहोत. तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे पतर या. या कामासाठी श्रीनगर व्हॅलीतील अनेक नागरिकांनी नावे नोंदवली आहेत. तरुणांना चांगली शिकवण देऊन त्यांना हातात शस्त्र उचालण्यापासून परावृत्त करण्याचे काम करण्यात येणार आहे."

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new mantra to catch terrorists alive