अयोध्येतील नवी मशीद पूर्वीएवढीच असणार

पीटीआय
Sunday, 6 September 2020

अयोध्येमध्ये आता मशिदीच्या उभारणीलादेखील वेग आला असून, येथे नव्याने उभारली जाणारी मशिदीची वास्तू पूर्वीच्या बाबरी मशिदीएवढीच मोठी असेल, अशी माहिती या वास्तूच्या उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या  ट्रस्टच्या पदाधिकाऱ्याने दिली आहे.

लखनौ - अयोध्येमध्ये आता मशिदीच्या उभारणीलादेखील वेग आला असून, येथे नव्याने उभारली जाणारी मशिदीची वास्तू पूर्वीच्या बाबरी मशिदीएवढीच मोठी असेल, अशी माहिती या वास्तूच्या उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या  ट्रस्टच्या पदाधिकाऱ्याने दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अयोध्येतील धान्नीपूर खेड्यामध्ये पाच एकरच्या परिसरात ही वास्तू उभारली जाणार असून त्यामध्ये रुग्णालय, वाचनालय आणि संग्रहालय देखील असेल. येथील संग्रहालयाची सूत्रे ही ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक पुष्पेश पंत यांच्याकडे सोपविली जाणार आहेत. मशिदीच्या परिसरामध्येच उभारण्यात येणाऱ्या इंडो-इस्लामिक रिसर्च सेंटरमध्ये (आयआयसीएफ) हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. मशिदीची ही वास्तू पंधरा हजार स्क्वेअर फूट परिसरामध्ये उभारण्यात येईल, उर्वरित जागेमध्ये अन्य सुविधा उभारण्यात येतील असे आयआयसीएफचे प्रवक्ते अतहर हुसैन यांनी सांगितले. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The new mosque in Ayodhya will be the same as before