Samvidhan Sadan: जुन्या संसदेचं नवं नामकरण! 'संविधान सदन' म्हणून मिळणार नवी ओळख; PM मोदींची सूचना

Samvidhan Sadan: जुन्या संसदेचं नवं नामकरण! 'संविधान सदन' म्हणून मिळणार नवी ओळख; PM मोदींची सूचना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या संसद भवनाच्या निरोप समारंभात सेन्ट्रल हॉलमधून देशाला संबोधित केलं.

नवी दिल्ली : जुन्या संसद भवनातून आता नव्या संसद भवनात सर्व कारभार स्थलांतरीत केला जाणार आहे. यासाठी जुन्या संसदेतील सेन्ट्रल हॉलमधून आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी जुन्या संसदेचं नवं नामकरणंही केलं, याला आता 'संविधान सदन' म्हणून ओळखलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (New name of old Parliament recognition as Samvidhan Bhavan PM Modi expressed in Central Hall)

मोदींनी केली सूचना

मोदी म्हणाले, "आज आपण या संसदेला निरोप देऊन नव्या संसद भवनात प्रवेश करणार आहोत. गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण या नव्या भवनात जात आहोत हे शुभ आहे. पण मी दोन्ही सभागृहातील नेत्यांना विनंती करतो, त्यांच्या समोर एक विचार ठेवतो. (Latest Marathi News)

मी आशा करतो की आपण दोघांनी मिळून या विचारावर कुठेही मंथन करुन यावर निर्णय घेऊ शकता. माझी सूचना आहे की, जर आपण नव्या संसद भवनात जात आहोत तर जुन्या संसदेची प्रतिष्ठा कधीही कमी होता कामा नये" (Marathi Tajya Batmya)

Samvidhan Sadan: जुन्या संसदेचं नवं नामकरण! 'संविधान सदन' म्हणून मिळणार नवी ओळख; PM मोदींची सूचना
Parliament Special Session: महिला आरक्षण विधेयकाबाबत महत्वाची अपडेट! एकाच जागी दोन खासदार?

संविधान भवन नवं नामकरण

"या भवनाला केवळ जुनी संसद म्हणून सोडून देऊ, असं होता कामा नये. त्यामुळं माझी प्रार्थना आहे की, जर तुम्ही दोघांनी भविष्यात याला सहमती दिली तर या जुन्या भवनाला 'संविधान सदन' म्हणून ओळखलं जावं.

कारण हे भवन कायम आपली जीवन प्रेरणा बनेल, तसेच जेव्हा या भवनाला आपण संविधान भवन म्हणून संबोधू तेव्हा त्या महापुरुषांचं देखील स्मरण होईल ज्यांनी जे कधी संविधान सभेत इथं बसले होते. त्यामुळं भावी पिढीला हे गिफ्ट देण्याची संधी आपण सोडायला नको," असंही मोदी यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com