

New Noida City development project planned across 21,000 hectares with residential, commercial and industrial zones under the Master Plan 2041
esakal
राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) आणखी एका नव्या शहराच्या उभारणीची तयारी सुरू झाली आहे. नोएडा पार्ट-३ अंतर्गत उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील खेकडा आणि बागपत तहसील परिसरात दिल्ली-देहरादून द्रुतगती मार्गालगत नवीन औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे. यासाठी संबंधित विकास प्राधिकरणाकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सविस्तर प्रस्ताव तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. शासनाची मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला गती दिली जाणार आहे.