New Sansad Bhavan: नवं 'संसद भवन' सज्ज; PM मोदींच्या हस्ते 'या' दिवशी होणार लोकार्पण

'सेन्ट्रल व्हिस्टा' विकास प्रकल्पात ६४,५०० स्वेअर मीटर जागेत नवं 'संसद भवन' उभारण्यात आलं आहे.
central vista
central vistasakal media

नवी दिल्ली : 'सेन्ट्रल व्हिस्टा' विकास प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेली नव्या 'संसद भवन'ची इमारत सर्व सुविधांनी सज्ज झाली असून लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते याचं लोकार्पण होणार आहे. याची तारीखही निश्चित झाली असून सुत्रांच्या माहितीनुसार, येत्या २८ मे २०२३ रोजी याचं उद्घाटनं होणार आहे. पण अद्याप अधिकृतरित्या याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. (New Sansad Bhavan ready inauguration will be done by PM Modi on this day)

central vista
Rahul Narwekar : कोर्टाला निर्णय घ्यायला १० महिने लागले, मी २ महिन्यात कसा घेऊ? नार्वेकरांचे हात वर

सुत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकारचं सत्ताकेंद्र असलेलं हे नवं संसद भवन आता कामकाजासाठी सज्ज झालं असून भव्य सोहळ्यात २६ मे रोजीच याचं उद्घाटन होणार असल्याच्याही चर्चा यापूर्वी सुरु होत्या. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती.

central vista
Trimbakeshwar : ...पण लोकांनीही सहकार्य करावं; त्र्यंबकेश्वरमधील प्रकारावर CM शिंदेंची प्रतिक्रिया

दरम्यान, नवी दिल्लीतील सेन्ट्रल व्हिस्टा विकास प्रकल्पांतर्गत नव्या संसद भवनाची इमारत उभारण्यात आली आहे. ६४,५०० स्वेअर मीटर जागेवर ही चार मजली इमारत उभारण्यात आली आहे. या नव्या इमारतीत १,२२४ खासदार बसू शकतात. यांपैकी लोकसभेच्या सभागृहातची ८८८ सीटची क्षमता आहे. तर राज्यसभेच्या सभागृहात ३८४ खासदार बसू शकतात.

त्रिकोणी आकाराच्या या नव्या संसद भवनाच्या इमारतीच्या बांधकामाला १५ जानेवारी २०२१ मध्ये सुरुवात झाली होती, जे ऑगस्ट २०२२ मध्ये पूर्ण होणार होतं. पण या काळात कोरोनाचा उद्रेक झाल्यानं आणि संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असल्यानं याच्या कामाला उशीर झाला.

काय आहेत वैशिष्ट्ये?

नव्या संसद भवनासाठी ९७० कोटी रुपये खर्च आला असून या इमारतीत प्रवेशासाठी तीन मार्ग आहेत. या मार्गांना ग्यान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार अशी नावं देण्यात आली आहेत. तसेच खासदार, व्हीआयपी आणि व्हिजिटर्सना प्रवेशासाठी यामध्ये स्वतंत्र मार्ग आहेत. या इमारतीत एक कॉन्टिट्युशन हॉल असणार आहे. यामध्ये देशाच्या लोकशाहीच्या वारशाची माहिती असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com