प्रसारणकर्त्याना नवी टीआरपी रेटींग

जाहीर करण्याचा मंत्रालयाचा आदेश
New TRP rating for broadcasters
New TRP rating for broadcasterssakal

नवी दिल्ली : देशातील प्रसारण कंपन्यांच्या संघटनेने (बीएआरसी) नवी टीव्ही रेटिंग(TV rating) (टीआरपी) (target rating point)तत्काळ जाहीर करावे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितले आहे. यासंदर्भातील आपली कार्यप्रणाली व निकष यात सुधारणा करीत असल्याचे बीएआरसी ने (Broadcast Audience Research Council)जाहीर केल्याने मंत्रालयाने त्यांना हा आदेश दिला आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये देशात टीआरपी घोटाळा उघड झाला होता. त्यानंतर ही रेटींग रद्द करण्यात आली होती.

New TRP rating for broadcasters
रोजगार एवढा देऊ की कॅनडाहून शीख परततील: केजरीवाल

ब्रॉडकास्टर्स ऑडियन्स अँड रीसर्च कौन्सिल (बीएआरसी) ने ही रेटिंग जाहीर करावीत. तसेच सध्याचा खरा कल कळण्यासाठी मागील तीन महिन्यांचा तपशील दरमहाच्या स्वरुपात जाहीर करावा, असेही मंत्रालयाने सांगितले आहे. टीआरपी सेवेच्या वापरात रिटर्न पाथ डाटा चा समावेश करण्याबाबत विचार करण्यासाठी मंत्रालयाने प्रसार भारतीच्या सीईओंच्या अध्यक्षतेखाली कार्यगटही नेमला आहे. ट्राय तसेच टीआरपी कमिटीनेही तशीच शिफारस केली होती. हा कार्यगट आपला अहवाल चार महिन्यांत देणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com