
नवी दिल्ली : लोकसभा सचिवालयाने नुकतीच लोकसभा (Loksabha) आणि राज्यसभेत (Rajyasabha) न वापरता येणाऱ्या शब्दांची एक यादी जाहीर केली आहे. त्यानुसार दोन्ही सभागृहात 'जुमलाजीवी', 'बाल बुद्धी', 'कोविड स्प्रेडर' आणि 'स्नूपगेट' यांसारख्या शब्दांसह 'विश्वासघाती', भ्रष्ट', 'नाटक', 'ढोंगी' आणि 'पाखंड' हे शब्द यापुढे लोकसभा आणि राज्यसभेत असंसदीय मानले जाणार आहेत. केंद्राच्या या निर्णयानंतर अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी केंद्रावर हल्लाबोल केला असून, काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) या निर्णयानंतर खोचक ट्वीट करत केंद्रवर बोचरी टीका केली आहे. (Rahul Gandhi On Unpariamentary Words )
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत न्यू इंडियाची खिल्ली उडवली आहे. त्यांनी लिहिले आहे की, "न्यू डिक्शनरी ऑफ न्यू इंडिया. असंसदीय म्हणजे चर्चा आणि वादविवादात वापरलेले शब्द, जे पंतप्रधानांच्या कार्याचे अचूक वर्णन करतात, ज्यावर आता बोलण्यास बंदी आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एक उदाहरण देखील दिले आहे. यात त्यांनी एक असंसदीय वाक्य लिहून, "जुमलाजीवी हुकूमशहाने मगरीचे अश्रू ढाळले जेव्हा त्याचा खोटेपणा आणि अक्षमता उघडकीस आल्याचे म्हटले आहे. हे नुद करताना राहुल गांधींनी काही शब्द बोल्डमध्ये लिहिले आहेत.
राहुल गांधींशिवाय डेरेक ओब्रायन, महुआ मोईत्रा, प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही सरकारवर टीका केली आहे. टीएमसीचे खासदार डेरेक ओब्रायन म्हणाले की, "अधिवेशन काही दिवसात सुरू होणार आहे. खासदारांवर जारी केलेल्या या आदेशानंतर आम्हाला यापुढे संसदेत भाषण करताना हे मूलभूत शब्द वापरण्याची परवानगी मिळणार नाही. मात्र, असे असतानादेखील मी विश्वासघात, भ्रष्ट, ढोंगी, पाखंड आदी शब्दांचा वापर करणार आहे. त्यासाठी मला निलंबित केले तरी चालेल परंतु, मी लोकशाहीसाठी लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेस खासदार जयराम रमेश म्हणाले, "मोदी सरकारच्या वास्तवाचे वर्णन करणारे सर्व शब्द आता असंसदीय मानले जातील. विश्वगुरु पुढे काय बंदी घालणार?" असा खोचक प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे. टीएमसी खासदार महुआ मोइत्रा म्हणाल्या की, बसा, बसा, प्रेमाने बोला. संसदेच्या असंसदीय शब्दांच्या नव्या यादीत संघाचा समावेश नाही. हे सुचवणाऱ्या विरोधकांकडून वापरल्या जाणार्या शब्दांवर सरकार बंदी घालत आहे. अशा प्रकारे भाजप भारताचा नाश करत असल्याचे म्हटले आहे.
तर, आपचे खासदार राघव चढ्ढा म्हणाले की, "असंसदीय शब्दांची ही सुधारित यादी स्वतःच असंसदीय आहे. यावरून भारत सरकार सत्याला घाबरत असल्याचे दिसून येते. 'जुमलाजीवी' सारखे शब्द असंसदीय झाले तर 'आंदोलनजीवी' राहिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.