
VIDEO: सॅल्युट! इंडियन आर्मीच्या वीर जवांनाचं New Year सेलिब्रेशन बघाच
New Year Celebration by Indian Army Soldiers:
2022 या नव्या वर्षाला आजपासून सुरुवात झाली. प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने नववर्षाचं स्वागत केलं. सर्वत्र नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा पाऊस पडत असताना इंडियन आर्मीच्या (Indian Army) काही जवानांनी अनोख्या पद्धतीने देशवासीयांना शुभेच्छा (New Year Wishes) दिल्या आहेत. या वीर जवानांनी केलेल्या अनोख्या नववर्ष स्वागताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.हा व्हिडीओ (Video)पाहून तमाम भारतीयांची छाती अभिमानाने फुलून आली नाही तरच नवल! जम्मू काश्मीरमधील (Jammu and Kashmir) कुपवाडा जिल्ह्यातील (Kupvada) लाईन ऑफ कंट्रोलजवळील (LOC) बर्फाने आच्छादलेल्या पर्वतावर इंडियन आर्मीच्या या वीर जवानांनी हे अनोखं सेलिब्रेशन केलं आहे.
हेही वाचा: India-Pak War | इंदिरा गांधीनी फिल्ड मार्शल माणेकशॉ यांचे ऐकलं नसतं तर...
व्हिडीओमध्ये दिसतंय की, इंडियन आर्मीचे काही वीर जवान आपल्या रायफल्ससह बर्फाने आच्छादलेल्या पर्वतावरून चालत येत आहेत. त्यांच्या हातात तिरंगा ध्वज (Tiranga Flag) आहे. प्रत्येक पावलागणिक त्यांचे पाय फुटभर खोल रोवत आहेत. परंतु तरीही ते चालत एका ठिकाणी येतात. एक जवान आपल्या हातातील तिरंगा मोठ्या ऐटीत तेथील जमिनीत रोवतो. त्यानंतर एक जवान भारतीयांना नववर्षाच्या शुभेच्छा देताना म्हणतो की, 'इंडीयन आर्मीकडून समस्त देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा...'
हेही वाचा: भारताचा एक घाव, पाकचे दोन तुकडे; असा झाला बांग्लादेशचा जन्म
पुढच्याच क्षणी जवानांच्या 'भारत माता की जय' (Bharat Mata ki Jay) या घोषणेनं परिसर दुमदमून निघाला. पांढऱ्याशुभ्र बर्फाच्या सानिध्यातील मानाने फडकणाऱ्या तिरंग्याच्या साक्षीने इंडियन आर्मीच्या जवानांच्या या अनोख्या नववर्षाच्या शुभेच्छांनी निश्चितच सर्व भारतीयांच्या छाती अभिमानाने फुलल्याशिवाय राहणार नाही.
Web Title: New Year Celebration By Indian Army Soldiers At Loc Kupwada Jammu And Kashmir
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..