India-Pak War | इंदिरा गांधीनी फिल्ड मार्शल माणेकशॉ यांचे ऐकलं नसतं तर...

Real Hero of India-Pak War-1971 | इंदिरा गांधीनी (Indiara Gandhi) जर फिल्ड मार्शल माणेकशॉ (General Manekshaw) यांचे ऐकलं नसतं, तर कदाचित भारताचं युद्धात मोठं नुकसान झालं असतं.
Indira Gandhi and Manekshaw
Indira Gandhi and ManekshawEsakal

१९७१ च्या भारत-पाक युद्धाचा खरा नायक | Real Hero of India-Pak War 1971:

3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी हवाईदलानं भारतीय हवाईदलाच्या (INDIAN AIR FORCE) श्रीनगर, अमृतसर आणि पठाणकोट हवाई तळांवर बाँम्बहल्ले केले आणि युद्धाची तार छेडली. परंतु १५ दिवसांच्या आतच म्हणजेच १६ डिसेंबर १९७१ भारतीय जवानांच्या शौर्यापुढे पाकिस्तानी सैन्याचं कंबरडं मोडलं आणि पाकिस्तानच्या ९०००० पेक्षा जास्त जवानांनी भारतासमोर शरणागती पत्करली. या युद्धामध्ये भारताच्या तीन्ही सैन्यदलांना अतुलनीय शौर्य गाजवलं. भारतानं हे युद्ध जिंकण्यात महत्त्वाची भुमिका बजावली ती फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ (Manekshaw) यांनी. इंदिरा गांधीना (Indira Gandhi) जर माणेकशॉ यांनी वेळीच सावध केले नसतं, भारताची जास्त हानी झाली असती. जाणून घेऊया १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धाचे (India Pakistan War) खरे नायक लष्करप्रमुख जनरल माणेकशॉ यांच्या योगादानाबद्दल...

Indira Gandhi and Manekshaw
भारताचा एक घाव, पाकचे दोन तुकडे; असा झाला बांग्लादेशचा जन्म

इंदिरा गांधी- माणेकशॉ भेट (Indira Gandhi and Manekshaw Meeting)-

१९७१ मध्ये पाकिस्तानमधील अंतर्गत राजकारणामुळे पूर्व पाकिस्तानमध्ये (आत्ताचा बांग्लादेश) पाकिस्तानी लष्कराने दडपशाही सुरु केली होती. आपल्याच देशातील साधारणपणे ३०-४० लाख लोकांचं लष्कराने शिरकाण केले आणि ३-४ लाख स्त्रियांवर बलात्कार केले गेले. लष्कराच्या या क्रुरतेला घाबरून जीव वाचवून अनेक लोक पूर्व पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित होत होते. भारताने मानवीय दृष्टीकोनातून आश्रितांसाठी कॅम्प उभारले. परंतु लवकरच ही संख्या १ कोटींच्या घरात पोचल्यामुळे भारताच्या साधनसंपत्तीवर अतिरिक्त ताण पडू लागला.

पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारण्याबाबत वारंवार चर्चा करूनही पाकिस्तानने त्याकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे संतापलेल्या इंदिरा गांधीनी पूर्व पाकिस्तानात सैन्य घुसवून पाकिस्तानी सैनिकांना तिथून हुसकावून लावायचं हे ठरवलं होते. आणि त्यासाठी त्यांनी एप्रिल १९७१ मध्ये तत्कालीन फिल्ड मार्शल माणेकशॉ यांना भेटीला बोलावलं.

Indira Gandhi and Manekshaw
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांना व्हिडिओ रुपात वाहिली आदरांजली...

फिल्ड मार्शल माणेकशॉ यांचा युद्धाविषयीचा मास्टरप्लॅन (Field Marshal Manekshaw's War Masterplan)-

इंदिरा गांधी यांनी जनरल मानेकशॉ यांना आपला मनोदय सांगितला. पूर्व पाकिस्तानातील परिस्थिती शांत करण्यासाठी युद्ध करावं हे त्यांनी मानेकशॉ यांना सांगितले. परंतु मानेकशॉ यांनी श्रीमती गांधींना लगेच युद्ध करण्यास नकार दिला. त्यामुळे इंदिरा गांधी त्यांच्यावर नाराज झाल्या.

परंतु आपण हिवाळ्यापर्यंत (Winter) वाट पाहिली तर हिवाळ्यात हिमालयात (Himalaya) होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे तसेच थंडीमुळे चीनचे सैन्य मागे जाईल आणि भारताची एक समस्या कमी होईल. यादरम्यानच्या मिळणाऱ्या वेळेत आपण आपल्या सैनिकांना युद्धासाठी अतिरिक्त प्रशिक्षण देऊ शकतो शिवाय मुफ्तिवाहिनीच्या बंडखोरांनाही ट्रेनिंग देऊ शकतो, जे पूर्व पाकिस्तानमध्ये पाक सैनिकांशी लढा देतील. यामुळे आपण सैनिकांना युद्धासाठी तयार करु शकतो त्यामुळे आपली हानीही कमी होईल.

Indira Gandhi and Manekshaw
भारत-पाकिस्तान युद्ध सुरु आहे का?, UP हिंसाचारावरुन राऊतांचा सवाल

युद्धाची तयारी (Preparation of War)-

जनरल माणेकशॉ यांची भुमिका इंदिरा गांधीनाही पटली. दरम्यान एप्रिल १९७१ मध्ये इंदिरा गांधींनी युरोपचा झंजावाती दौरा केला आणि ९ ऑगस्ट १९७१ रोजी रशियाशी २० वर्षांचा मैत्रीचा करार करून सर्व जगाला चकीत करून सोडलं. खासकरून अमेरिकेला, ब्रिटनसारख्या देशांना हा धक्का होता. रशियासोबतच्या मैत्रीमुळे चीनही या युद्धापासून दूर राहिला. दरम्यानच्या काळात भारताने प्रशिक्षित केलेल्या मुक्तिवाहिनीने पूर्व पाकिस्तानाच पाक सैनिकांवर हल्ले करायला सुरुवात केली. भारताने त्यांना लष्करी साहित्याची मदत केली.

पाकने छेडले युद्ध, भारताचे सडेतोड प्रत्युत्तर-

दिवसेंदिवस भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिक वाढत गेला. युद्ध होणार हे जवळपास निश्चित झाले. परंतु काहीही झालं तरी पहिल्यांदा करायचं नाही हे इंदिरा गांधीनी आणि मानेकशॉ यांनी ठरवलं होते. इकडे थंडीमुळे चिनी आक्रमणाची शक्यताही कमी झाली. परंतु पाकिस्तानचा संयम सुटला. 23 नोव्हेंबर 1971 रोजी पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष याह्याखान यांनी पाकिस्तानमध्ये आणीबाणी लागू केली आणि 3 डिसेंबर रोजी पाकिस्तानी हवाईदलाने उत्तर भारतातील अनेक हवाईतळांवर हल्ले चढवून युद्धाची सुरुवात केली. भारताला जे हवं होतं ते झालं. पाकिस्ताननं प्रथम हल्ला केला त्यामुळे युद्ध का केलं हे भारताला कुणी विचारणार नव्हतं. आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तर देण्यासाठी भारत आता ठोस कारण होतं. ४ डिसेंबर रोजी भारतानं अधिकृतरित्या युद्ध पुकारलं.

भारतानं युद्ध जिंकलं (India won war)-

भारताच्या आर्मी,नेव्ही आणि एअरफोर्सने पाकिस्तानी सैनिकांना सळो की पळो करून सोडलं. प्रत्येक आघाडीवर भारताने पाकिस्तानला पराभूत केलं. राजस्थानमधील लोंगेवाला येथे तर भारताच्या केवळ १२० वीरांनी रणगाडे आणि आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा २५०० पाकिस्तानी सैनिकांना रात्रभर रोखून धरलं. सुर्योदय होताच हवाईदलाने पाक सैनिकांची धुळधाण उडवली. नेव्हीने कराची बंदर उध्वस्त केलं.

भारतीय सैनिकांच्या शौर्यामुळे पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले. १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानच्या ९० हजार पेक्षा जास्त सैनिकांनी भारतापुढे शरणागती पत्करली. भारतानं हे युद्ध जिंकलं.

या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या युद्धातील भारताच्या संरक्षण दलांचे एकत्रित शौर्य अख्ख्या जगाने पाहिले. राजकीय आणि लष्करी समन्वय हे युद्धाचं वैशिष्ट्य ठरलं. दरम्यान जनरल मानेकशॉ यांची या युद्धातील भुमिका निश्चितच महत्त्वाची होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com