

₹19,000 Crore Greenfield Corridor to Transform Nashik–Solapur Connectivity
Sakal
नवी दिल्ली: केंद्र सरकारने महाराष्ट्राला नववर्षाची भेट देताना नाशिक ते सोलापूरदरम्यान १९ हजार १४२ कोटी रुपये खर्चाचा सहा पदरी ‘ग्रीनफिल्ड कॉरिडॉर’ (३७४ किलोमीटर) विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर ते दक्षिण महाराष्ट्राला सहापदरी महामार्गाने जोडणारा हा प्रकल्प महाराष्ट्रासह तेलंगण, आंध्रप्रदेश या राज्यांची जीवनरेखा बनेल, असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे.