

Agra Administration Announces Traffic Diversions
Sakal
आग्रा : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ताजमहल पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने २५ डिसेंबर ते ५ जानेवारीदरम्यान आग्र्यातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल लागू केले आहेत. पर्यटकांना त्रास होऊ नये आणि वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी ही नियमावली आखण्यात आली आहे.