अटक टाळण्यासाठी 'त्यानं' मागितली होती दयेची भीक; महिलेच्या अंगावर लघवी करणारा आरोपी फरार I Air India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Air India

विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये घडलेल्या या घटनेनंतर फ्लाइट क्रूनं त्या पुरुषाला महिलेच्या सीटजवळ नेलं आणि महिलेची माफी मागण्यास सांगितलं.

Air India : अटक टाळण्यासाठी 'त्यानं' मागितली होती दयेची भीक; महिलेच्या अंगावर लघवी करणारा आरोपी फरार

एअर इंडियाच्या (Air India) विमानात महिलेच्या अंगावर लघवी करणाऱ्या व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत. शंकर मिश्रा असं या व्यक्तीचं नाव असून तो मुंबईस्थित व्यापारी आहे.

विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये घडलेल्या या घटनेनंतर फ्लाइट क्रूनं त्या पुरुषाला महिलेच्या सीटजवळ नेलं आणि महिलेची माफी मागण्यास सांगितलं. तिथं त्या व्यक्तीनं महिलेकडं अटक टाळण्यासाठी विनवणी केली.

हेही वाचा: Crime News : विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या; मृतदेहाचे तुकडे करून कालव्यात दिले फेकून

महिलेनं एअर इंडिया ग्रुपचे (Air India Group) चेअरमन एन चंद्रशेखरन यांना 27 नोव्हेंबरला घडलेल्या प्रकाराबद्दल सगळं सांगितलं. मात्र, कंपनीनं 4 जानेवारी रोजी त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली. 26 नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या विमानामध्ये शंकर मिश्रा यानं मद्यधुंद अवस्थेत एका महिलेवर लघवी केल्याचा आरोप आहे.

हेही वाचा: Sammed Shikhar : 'सम्मेद शिखर'साठी आणखी एका जैन साधूनं दिली प्राणाची आहुती; समर्थ सागर महाराजांचं निधन

दरम्यान, तिथं विमानात उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांनी त्याला आपल्या जागेवर जाण्यास सांगितलं. मात्र, मद्यधुंद शंकरनं कोणाचंही ऐकलं नाही. विमान अधिकाऱ्यानं सीट बदलण्यास सांगितलं असता त्यानं नकार दिला. महिलेनं या संपूर्ण घटनेचा एफआयआरमध्ये उल्लेख केला आहे.