esakal | महिला न्यूज अँकरची गळफास घेऊन आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

priya juneja

एका टीव्ही चॅनेलमध्ये काम करणाऱी अँकर प्रिया जुनेजाने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. प्रियाने शुक्रवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली.

महिला न्यूज अँकरची गळफास घेऊन आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्येनंतर आणखीही काही कलाकारांनी जीवन संपवलं. आता एका टीव्ही चॅनेलमध्ये काम करणाऱी अँकर प्रिया जुनेजाने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. प्रियाने शुक्रवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. प्रियाला ओळखणाऱ्यांनी सोशल मीडियावरून दुख: व्यक्त केलं आहे. तसंच प्रियाचा स्वभाव माहिती असल्यानं तिनं आत्महत्या केली यावर विश्वास नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

मूळची पंजाबची असलेल्या प्रियाने दिल्ली विद्यापीठातून पदवीचं शिक्षण गेतलं होतं. त्यानंतर Guru Jambheshwar University Hisar विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं. न्यूज अँकरिंगशिवाय ती मॉडेलसुद्धा होती. तसंच रेडिओमध्येही तिनं काम केलं होतं. तिने आत्महत्या का केली? असा प्रश्न मित्रपरीवारातून विचारला जात आहे. 

प्रियाच्या एका मित्राने लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, असं काय झालं की तिने आत्महत्या केली. नुकतंच तिच्याशी बोलणं झालं होतं तेव्हा तर ती आनंदात होती. तिच्याकडं नोकरी होती, आर्थिक परिस्थितीही चांगली होती. तिच्याकडं अँकरिंगचा अनुभव होता. अशी कोणती गोष्ट तिला त्रास देत होती की ज्याबद्दल ती बोलली नाही? असंही यामध्ये मित्राने विचारलं आहे. 

दोनच दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली होती.  अभिनेता आशुतोष भाकरे याने नांदेडमधील राहत्या घरात आत्महत्या केली. आशुतोषने गळफास घेत स्वत:चे आयुष्य संपवले. त्याआधी त्यानं सुशांतच्या आत्महत्येनंतर एक व्हिडिओही पोस्ट केला होता. त्यामध्ये माणूस आत्महत्या का करतो यासंदर्भात विश्लेषण करण्यात आलं होतं. त्यानंतर आशुतोषच्या आत्महत्या केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 

आशुतोष हा मागील काही दिवसांपासून बेचैन होता. बुधवारी सकाळी त्याने सर्वांसोबत नाष्टा केला. गप्पा गोष्टी करुन तो आपल्या खोलीमध्ये गेला. तो परत आलाच नाही. दरवाजा उघडून पाहिले असता आशुतोष हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.