esakal | ShaheenBagh: शाहीन बाग परिसरात जमाब बंदी आदेश; आंदोलन मोडून काढणार?
sakal

बोलून बातमी शोधा

New delhi shaheen bagh article 144 huge security forces deployed

शाहीनबाग परिसरात जमाव बंदी आदेशाचे 144 कलमी लागू करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी जाहीर केलंय.

ShaheenBagh: शाहीन बाग परिसरात जमाब बंदी आदेश; आंदोलन मोडून काढणार?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शाहीन बाग आंदोलन परिसरात आज, सकाळपासून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. परिसरात जमाव बंदी आदेशाचे 144 कलमी लागू करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी जाहीर केलंय. शाहीन बाग आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

हिंदू सेनेची धमकी
गेल्या अडीच महिन्यंपासून हे आंदोलन सुरू असतानाच, हिंदू सेना या संघटनेने रविवारी हे आंदोलन संपवण्याची धमकी दिली आहे. त्यांच्या धमकीची दिल्ली पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, त्यामुळेच शाहीनबाग परिसरात जमावबंदी आदेश लागू केलाय. पोलिसांसह निमलष्करी दलाही मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलयं. त्यामुळं शाहीनबाग परिसरात तणावाचं वातावरण आहे. ईशान्य दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आणि विरोधातील गट आमने-सामने आल्यामुळं हिंसाचार उसळला होता. गेल्या आठवड्यात ईशान्य दिल्ली धगधगत होती. परिणामी शाहीनबाग संदर्भात देण्यात आलेल्या धमकीच पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.

आणखी वाचा - अस्पृश्यता निवारणात, आंबेडकर, फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान मोठे; शरद पोंक्षेंचे वक्तव्य  

काय आहे शाहीनबाग आंदोलन?
दिल्लीतील शाहीन बाग या मुस्लिम बहुल परिसरात 15 डिसेंबर 2019 रोजी रास्तारोको आंदोलन सुरू झाले. त्यानंतर जवळपास अडीच महिन्यांपासून शाहीनबाग आंदोलनाने रास्ता-रोको आंदोलन सुरू ठेवले आहे. ओखला परिसरातील कलांडी कुंज परिसरातील हायवेला रोखून धरलंय. त्यामुळं परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण येत आहे. आंदोलनाचे ठिकाण इतरत्र हालण्यात यावे यासाठी सुप्रीम कोर्टाने मध्यस्थांमार्फत हस्तक्षेप केला होता. त्यावर आंदोलकांकडून विचार करण्यासाठी वेळ मागण्यात आला. पण, तिढा काही सुटला नाही. 

loading image