esakal | अस्पृश्यता निवारणात आंबेडकर, फुलेंपेक्षा सावकरांचे योगदान मोठे; शरद पोंक्षेंचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

sharad ponkshe statement about veer savarkar regarding untouchability

आपण भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असा उल्लेख करायला सुरुवात करायची. यामुळे भारतरत्न पुरस्काराचा सन्मान होईल, असं वकत्व्य अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले आहे.

अस्पृश्यता निवारणात आंबेडकर, फुलेंपेक्षा सावकरांचे योगदान मोठे; शरद पोंक्षेंचा दावा

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना सरकारने भारतरत्न देण्याची वाट कशाला पाहायची. महात्मा गांधी, महात्मा फुले यांना महात्मा उपाधी सरकारने दिली होती का? सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी सरकारने दिली होती का? त्यामुळं आपण भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असा उल्लेख करायला सुरुवात करायची. यामुळे भारतरत्न पुरस्काराचा सन्मान होईल, असं वकत्व्य अभिनेते शरद पोंक्षे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात 'मी सावरकर' वकृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, अस्पृश्यता निवारणाचं सावरकरांचं मोठं योगदान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या 'या'  वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. स्वातत्र्यवीर सावरकर ब्राह्मण समाजात जन्माला आले तरी, ते अस्पृश्यता निवारणासाठी ब्राह्मणांच्या विरोधात उभे राहिले त्यामुळं त्यांचे योगदानही सगळ्यांपेक्षा मोठे आहे, असा दावा शरद पोंक्षे यांनी केला. 

आणखी वाचा - इंदोरीकर महाराज म्हणतात, 'लोकच ग्रंथाला प्रमाण मानत नसतील तर काय करणार?'

जगावर एक दिवस हिंदू राज्य असेल 
शरद पोंक्षे यांनी स्वामी विवेकानंदांचा दाखला देत पृथ्वीतलावर प्रत्येक मुलगा जन्माला येणारा हिंदू असतो. मग त्याचे आई-वडील त्यावर धर्मानुसार संस्कार करुन सभासद करतात. इथून कट्टरता सुरु होते मात्र हिंदू कट्टर नसल्याचं त्यांनी सांगितलं. देशात बहुसंख्य 80 टक्के हिंदू असून हे हिंदू राष्ट्र आहे. जगावर एक दिवस हिंदू राज्य असेल असाही दावा शरद पोंक्षे यांनी केला.

आणखी वाचा - अरे वाह्, आता लातूरला होणार चिकन महोत्सव 

पुन्हा राहुल गांधी लक्ष्य
राहुल गांधी यांचा नामोल्लेख टाळत शरद पोंक्षे यांनी दिल्लीतील वेडा मुलगा म्हणत हेटाळणी केली. दिल्लीतील वेडा मुलगा काहीतरी बडबड करत असून, मी त्याचे आभार मानतो. हिंदू फार थंड असून, पेटायला वेळ लागतो. ब्रिटिशांप्रमाणेच आजही सावरकर यांची भीती आणि दहशत आहे. त्या वेड्या मुलाने असंच बोलत राहावे, मात्र त्याला त्याच्या आजीचा इतिहास माहित नाही. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी सावरकर यांच्या स्मारकाला निधी दिला. त्याचबरोबर पोस्टाच्या तिकिटावर सावरकरांचे छायाचित्रे प्रसिद्ध केले होते असं शरद पोंक्षे यांनी सांगितलं.

आणखी वाचा - सातारकरांना टोल माफ होणार; पालकमंत्र्यांचा पुढाकार

दरम्यान,  स्वातंत्रवीर सावरकर विषयावर पोंक्षे यांचे व्याख्यानाचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी आरपीआयच्या खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली होती. हिंसेला समर्थन देणाऱ्या शरद पोंक्षे यांनी अटक करावी व कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. पोंक्षे यांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश करताच विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी सुरू होती.