Madhya Pradesh: सापानं दंश केला, पोरानं सापालाच कडकडून घेतला चावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Madhya Pradesh

Madhya Pradesh: सापानं दंश केला, पोरानं सापालाच कडकडून घेतला चावा

Madhya Pradesh: मध्य प्रदेशमधील जशपूरमध्ये सर्पदंशाच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र यावेळी एक प्रकरण समोर आलं आहे, ते थोड विचित्र आहे. येथे राहणाऱ्या एका मुलाला साप चावला. यानंतर मुलाने रागाच्या भरात सापाचा चावा घेतल्याची घटना घडली आहे. मुलाने सापाला अशा प्रकारे चावले की सापाचा मृत्यू झाला.

यानंतर मुलाने सर्पदंशाची माहिती घरच्यांना सांगितल्यावर कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले, त्याची प्रकृती स्थिर आहे. हे प्रकरण जशपूर जिल्ह्यातील उद्यान विकास गटाशी संबंधित आहे. पांडरपथ येथे राहणारा मुलगा घरापासून काही अंतरावर असलेल्या बहिणीच्या घरी गेला होता. खेळत असताना साप त्याच्या हाताला चावला. यानंतर दिपक राम नावाच्या या मुलालाही राग आला आणि त्याने सापाला पकडून सापाचा चावा घेतला.

हेही वाचा: Girish Mahajan: बच्चू कडू-रवी राणांमधील वाद मिटवण्यात गिरीश महाजनांची भूमिका

दरम्यान सापाने दिपकच्या हाताला चांगलेच वेटोळे घातलो होतो. ही बातमी मुलाच्या बहिणीला समजताच तिने तत्काळ मुलाला हॉस्पिटलमध्ये नेले. आता मुलाची प्रकृती स्थिर आहे. जशपूर जिल्ह्यात अशीही अंधश्रद्धा आहे की, तुम्हाला साप चावला तर त्याच्या विषाचा परिणाम होत नाही.

टॅग्स :snake