Girish Mahajan
Girish Mahajanesakal

Girish Mahajan: बच्चू कडू-रवी राणांमधील वाद मिटवण्यात गिरीश महाजनांची भूमिका

गिरीश महाजनांची शिष्टाई कशी कामाला आली

अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आणि प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू वादात गिरीश महाजनांची शिष्टाई कामाला आली आहे. कारण देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय असणाऱ्या अपक्ष आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बच्चू कडूंनीही १ नोव्हेंबरपर्यंत रवी राणांनी केलेल्या आरोप सिद्ध करण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात आणि शिंदे-फडणवीस गोटातही हालचालींना वेग आला.

पण हा वाद मिटवण्यात मध्यस्थी घेत शिष्टाईची भूमिका निभावली ती भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी. काही दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यात बैठक झाली. या बैठकीत बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात समेट करण्याचं काम महाजन यांच्याकडे देण्यात आलं होतं. त्यानुसार महाजन यांनी बच्चू कडू आणि रवी राणांशी चर्चा करून नाराजी दूर करण्याचं काम केलं तर दुसरीकडे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री या दोघांनी दोन्ही नेत्यांना वेळोवेळी कानपिचक्या देत दबाव ठेवल्याची माहिती मिळतेय.

दुसरीकडे आज वादावर पडण्याआधी काल रात्रीही घडामोडी घडल्या. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर काल रात्री जवळपास अडीच तास खलबतं झाली. रवी राणा आणि बच्चू कडू यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर रविवारी मध्यरात्री २ वाजेपर्यंत भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिष्टाई करत दोन्ही नेत्यांशी चर्चा केली. त्यांच्या मध्यस्थीनंतर आज सकाळी पुन्हा एकदा रवी राणा यांनी फडणवीसांची त्यांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली.

Girish Mahajan
Video: पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांकडून 400 रूपयांची वसुली; पाहा व्हिडिओ

भेटीनंतरच रवी राणांनी बच्चू कडूंवर केलेले आरोप मागे घेतले आणि दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे रवी राणांना माघार घेण्यासाठी समजूत काढण्यात महाजनांची भूमिका महत्वाची मांडली जाते. तर तिकडे रवी राणांनी माघार घेतल्यानंतरही आमदार बच्चू कडूंनी मात्र आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय. आता यात उद्या बच्चू कडू काय भूमिका घेणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

दरम्यान, रवी राणा-बच्चू कडू वादात शिष्टाईची भूमिका घेणारे गिरीश महाजन हे भाजपचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध आहेत. कारण कुठलाही मोर्चा असो वा छोटमोठं आंदोलन असो, त्यात भाजप पक्ष असो वा फडणवीसांचं सरकार, आंदोलकांसोबत चर्चेसाठी कायम महाजनांनाच पुढे केलं जातं. २०१४ च्या फडणवीस सरकारच्या काळातही मुंबईत आलेला शेतकरी, शेतमजूर मोर्चा, मराठा क्रांती मोर्चा, ऐन दिवाळीतलं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन यातही महाजनांची समन्वयकाची भूमिका होती. याशिवाय, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं उपोषण मागे घेण्यातही महाजनांनी खारीचा वाटा उचलला होता.

Girish Mahajan
Devendra Fadnavis: 'माझा एक फोन, बच्चू कडू गुवाहाटीला'

अगदी आताचं सांगायचं झालं तर, राज्यसभेच्या निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीस कोरोनाबाधित होते, त्यामुळे ते होम क्वारंटाईन असतानाही आमदारांशी चर्चेची जबाबदारी महाजनांच्या खांद्यावर होती. आणि त्यातही ते यशस्वी झालेले दिसले. शिवाय, पक्षासाठी सांगायचं झाल्यास, महाजनांनीच जळगाव महापालिकेतील सुरेशदादा जैन यांच्या ४ दशकांच्या सत्तेला हादरे देत महापालिका भाजपच्या ताब्यात आणली होती. धुळे महापालिकेतही अनिल गोटे, काँग्रेस, राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करुन भाजपला एकहाती सत्ता मिळवून दिली. नाशिकचे पालकमंत्रीपद सांभाळताना महापालिकेवर भाजपला वर्चस्व मिळवून दिले. त्यामुळे गिरीश महाजनांनी कायमच पक्ष असो, फडणवीस असो वा राज्यातलं त्यांचं सरकार असो, त्यांना कायम दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडलेली दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com