हिंदू शब्दावर काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान! "हिंदू शब्द पर्शियातून आला ... याचा अर्थ अत्यंत..." | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka

हिंदू शब्दावर काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान! "हिंदू शब्द पर्शियातून आला ... याचा अर्थ अत्यंत..."

Karnataka: काँग्रेस सातत्याने हिंदू मतांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काँग्रेस मधील नेते मात्र त्यावर पाणी सोडत आहेत. कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्याक्ष सतीश जारकीहोली यांनी हिंदू शब्दावरून वादग्रस्त विधान केलं आहे. ते एका सभेत म्हणाले म्हणाले "हिंदू शब्दाचा अर्थ खुप घाण आहे" या विधानामुळं कर्नाटकात मोठा वाद पेटला आहे.

त्यामुळं काँग्रेस पक्ष टीकेचा धनी बनला आहे. सतीश जारकीहोळी यांनी हिंदू शब्दा विषयी म्हटले आहे की, हिंदू हा शब्द पर्शियामधून आला आहे. हिंदू या शब्दाचा अर्थ ही अगदी गलिच्छ आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते कर्नाटकातील बेलागावी जिल्ह्यातील निप्पाणी भागात एका निवडणूक सभेला संबोधित करत होते, आणि याच दरम्यान त्यांनी हिंदू शब्दा विरोधात असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

काँग्रेस नेते सतीश जारकीहोली म्हणाले की "हिंदू हा शब्द फक्त भारतीय नसून तो परदेशी फारसी शब्द आहे. त्याची जबरदस्ती आपल्यावर केली जात आहे. त्यामुळं त्याला काही अर्थ नाही. केवळ आपल्या देशाचा नसलेल्या शब्दासाठी आपल्यावर दबाव का आणला जातो, यावर चर्चा व्हायला हवी, हिंदू हा शब्द परकीय आहे, त्याबद्दल आपल्या देशात बोलू नये.

टॅग्स :Congresscongress leader