Prashant Kishor: 'पुढचे 20 ते 30 वर्षे भाजपचेच'; लोकसभेची चूक मान्य करताना पीकेंनी केली आणखी एक भविष्यवाणी

Prashant Kishor Another prediction: निवडणूक रणनीतीकार आणि राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीबाबत व्यक्त केलेला अंदाज खोटा ठरला होता.
Prashant Kishor
Prashant Kishor

नवी दिल्ली- निवडणूक रणनीतीकार आणि राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीबाबत व्यक्त केलेला अंदाज खोटा ठरला होता. याबाबत प्रशांत किशोर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच भाजपबाबत नवी भविष्यवाणी देखील केली आहे. ते इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला ३०३ किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळतील. तसेच एनडीएला ३६० किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला होता. पण, ते सपशेल चूक ठरले आहेत. भाजपला २४० जागा मिळाल्या असून एनडीएला ३०० चा आकडा देखील गाठता आला नाही. यावर विचारले असता प्रशांत किशोर यांनी आपला अंदाज चुकल्याचं मान्य केलं आहे.

Prashant Kishor
Prashant Kishor: प्रशांत किशोर यांचा दावा का ठरला फोल? भाजप 303 पार वर होते ठाम

प्रशांत किशोर यांनी आपलं आकलन चुकलं असं मान्य केलं असलं तरी त्यांनी गोष्टींना संख्येच्या पुढे जाऊन पाहायला हवं अशी पुष्टी देखील जोडली आहे. ते म्हणाले की, ''हो, मी चूक ठरलो, माझा अंदाज २० टक्के कमी पडला. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात कोणताही रोष जनतेच्या मनामध्ये नाही, कारण त्यांच्या वोट शेयरमध्ये काहीही फरक पडलेला नाही.''

भाजपच्या जागांबाबत भविष्यवाणी खोटी ठरली मात्र भाजपच्या वोट शेअरमध्ये कमी झालेली नाही. त्यांचा वोट शेअर कायम आहे. संख्येच्या पुढे जाऊन पाहायला हवं. तेव्हा तुम्हाला माझं आकलन तितकं चूक दिसणार नाही. भाजपला ३६ टक्के वोट शेअर मिळाले आहेत. मागच्या वेळेसारखेच ते आहे. मोदी पुन्हा आले आहेत आणि एनडीए सरकार स्थापन करत आहे, असं पीके म्हणाले.

Prashant Kishor
Lok Sabha Exit Poll: पुढच्या वेळी जेव्हा निवडणुका... एक्झिट पोल येताच प्रशांत किशोर यांचे खळबळजनक ट्विट

२० ते ३० वर्षे भाजपचाच प्रभाव

भाजप देशात पुढचे २० ते ३० वर्षे एक प्रमुख ताकद असेल. पुढचे २० ते ३० वर्षे भाजपच्या प्रभावाचे युग असेल. याचा अर्थ असा नाही की भाजप निवडणूक हरणार नाही. त्यांना विरोधी पक्षात देखील बसावं लागू शकतं. पण, देशाच्या राजकारणात ते प्रभावशाली राहतील. जसं काँग्रेससोबत ४० वर्षापर्यंत झालं, तसं पुढचे २० ते ३० वर्षे भाजपच्या भोवतीच राजकारण फिरत राहील. ते प्रमुख राजकीय शक्ती असतील, असं पीके म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com