
नवी दिल्ली : सोनिया गांधी यांच्यानंतर नेहरू-गांधी घराण्याव्यतिरिक्त काँग्रेसच्या अध्यक्षपदी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर 71 वर्षीय गेहलोत यांनी गांधींच्या स्पष्ट पाठिंब्याने उमेदवारी दाखल केली, तर काँग्रेसच्या G-23 गटाकडून त्यांना आव्हान देणारा दुसरा उमेदवार दिला जाऊ शकतो. इंडियन एक्स्प्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे. (next Congress chief Gandhis veer towards Ashok Gehlot G-23 towards a challenge)
निवडणुकीबाबतच्या सर्व अटकळांना पूर्णविराम देत काँग्रेसने बुधवारी जाहीर केले की "काँग्रेस अध्यक्षांच्या निवडणुकीच्या तारखांचे अचूक वेळापत्रक मंजूर करण्यासाठी रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक आयोजित केली जाईल. राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासह वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात असलेल्या सोनिया गांधी या महत्त्वपूर्ण बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील.
दरम्यान, तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या गेहलोत यांची गांधींनी भेट घेतल्याच्या एका दिवसानंतर CWC बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. राहुल हे सुकाणूपदावर परतण्यास इच्छुक नसल्यामुळं, सोनियांनी राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना पक्षाचे नेतृत्व स्वीकारण्यास सांगितल्यांच सुत्रांकडून कळतं. गेहलोत यांनी पक्षप्रमुखपद स्वीकारल्यास त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागू शकते म्हणून ते नाखूष असल्याचंही सांगितलं जात आहे.
भाजपच्या प्रचाराला उत्तर देण्याच्या तयारीत
24 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बिगर-गांधी व्यक्तीला पक्षाच्या सर्वोच्च पदावर बसवून घराणेशाहीच्या राजकारणाचा भाजपचा हल्ला खोडून काढण्याची काँग्रेसची तयारी असू शकते. एकीकडे काँग्रेसचे टीकाकार अजूनही असे म्हणतील की काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी घरातील व्यक्तीचीच निवड होईल पण गांधी कुटुंबाकडून वेगळा विचार केला जाऊ शकतो.
गेहलोत काँग्रेसचे कट्टर निष्ठावंत
गेहलोत हे काँग्रेसचे कट्टर निष्ठावंत असले तरी, ते हिंदी पट्यातील काँग्रेसचा सर्वात प्रमुख चेहरा आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अर्थपूर्ण आव्हान उभं करायचं असेल तर काँग्रेसला पुनरुज्जीवन करण्याची नितांत गरज आहे. गेहलोत हे ओबीसी नेते आहेत आणि भाजप आक्रमकपणे ओबीसींना आकर्षित करत आहे. भूतकाळात अनेक राज्यांचे आणि संघटनेचे प्रभारी सरचिटणीस म्हणून काम केल्याचा देखील त्यांना समृद्ध संघटनात्मक अनुभव आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.