NFHS Survey: अल्पवयीन मुली गरोदर होण्याचे प्रमाण वाढले!

NFHS Survey: अल्पवयीन मुली गरोदर होण्याचे प्रमाण वाढले!
Updated on

भारतात बलात्कार, अल्पवयीन विवाह आणि कमी वयात झालेल्या नातेसंबंधामुळे अल्पवयीन मुलींमध्ये गर्भधारणा होण्याचे प्रमाण वाढते आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणादरम्यान हे स्पष्ट झाले आहे. दिल्लीत अशा गर्भधारणा होण्याचे प्रमाण अधिक आहे. सर्वेक्षणानुसार, दिल्लीत गेल्या वर्षी 1.2 टक्के अल्पवयीन मुलींच्या गर्भधारणेची प्रकरणे समोर आली. हे प्रमाण वाढले असून ते 3.3 टक्के झाले आहे.

अल्पवयीन गर्भधारणा म्हणजे काय?

वयवर्षे 15 ते 19 दरम्यान होणाऱ्या गर्भधारणेला अल्पवयीन गर्भधारणा म्हटले जाते. 2020-21 च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 मध्ये हा धक्कादायक खुलासा करण्यात आलेला आहे. लैगिक छळ म्हणजेच बलात्कार, कमी वयात झालेले लग्न आणि कमी वयात नातेसंबंध निर्माम होणे, ही यापाठची महत्वाची कारणे आहे. स्त्रीरोगतज्ज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

NFHS Survey: अल्पवयीन मुली गरोदर होण्याचे प्रमाण वाढले!
'मॅडम, माझा बालविवाह होतोय!' फोन करून मुलाने थांबवले स्वत:चे लग्न

गावात सर्वांत जास्त प्रकरणे

2015-16 च्या सर्वेक्षणानुसार दिल्लीत 15 ते 19 वयोगटादरम्यान अल्पवयीन गर्भधारणेचा दर 2.1 टक्के होता. तो 3.3 टक्यांपर्यंत वाढला आहे. जेव्हा हे सर्वेक्षण होत होते तेव्हा 15 ते 19 वयोगटातील मुलींना अपत्य झाली होती. तर काही गरोदर होत्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गावात अल्पवयीन मुली गर्भवती होण्याचे प्रमाण जास्त आहे. गावांत अल्पवयीन गर्भवतींचा दर 9.7 टक्के आहे. तर शहरात तो 3.2 टक्के आहे. गावातील 15 ते 19 वयोगटातील बलात्कार पिडितांना तसेच त्यांच्या कुटूंबातील लोकांना वैद्यकीय क्षेत्राचे फारसे ज्ञान नसते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. तर एक कारण असेही आहे की, काही गावात मुलींचे लवकर लग्न केले जाते. बदलत्या काळानुसार अल्पवयीन मुलींची गर्भधारणा ही चिंतेची बाब बनली आहे.

शहरांमध्ये काय स्थिती?

सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अल्पवयीन तरूणाईला रिलेशनशीपमध्ये असणे आवडू लागल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. त्यामुळे मुली गर्भवती होण्याचे प्रमाणही वाढले आहे. अशी प्रकरणे अनेकदा खासगी रूग्णालयात जातात, पण काहीवेळा अशी प्रकरणे सरकारी रूग्णालयांमध्येही येतात. शहरात मुलीची वैद्यकीय स्थिती पाहून 20 आठवड्यात गर्भपात केला जातो. त्यामुळे मुलाला जन्म देण्याची वेळ तिच्यावर येत नाही, हेही एक कारण सांगितले जात आहे.

NFHS Survey: अल्पवयीन मुली गरोदर होण्याचे प्रमाण वाढले!
बायको म्हणे, नवऱ्यानं केलेली मारहाण योग्यच; संशोधनाचा निष्कर्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com