

Vehicle Insurance Expiry FASTag Insurance Check
esakal
Toll Plaza Insurance Check : राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना आता टोल नाक्यावरच वाहनाच्या विम्याबाबत सूचना मिळणार आहेत. फास्टॅगच्या माध्यमातून टोल वसुली करतानाच वाहनाच्या थर्ड पार्टी विम्याची वैधताही तपासली जाणार आहे. विम्याची मुदत संपली असल्यास संबंधित वाहनमालकाच्या मोबाईलवर एसएमएस पाठवून सतर्क केले जाणार आहे. विनाविमा वाहनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) ही यंत्रणा सुरू केली आहे.