

NHAI highway safety initiative: A national highway displaying the NHAI signboard, representing new guidelines for ambulance services, highway patrol vehicles and emergency assistance for motorists
esakal
राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना वाहनांचा अपघात होणे किंवा वाहन बंद पडणे अशा प्रसंगी वाहनचालकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) नवीन पावले उचलली आहेत. महामार्गावर वाहनांची वाहतूक सुरू करण्यापूर्वीच रुग्णवाहिका, गस्त घालणारी वाहने आणि अपघातग्रस्त वाहने हटवण्यासाठी टो-अवे क्रेन उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्राधिकरणाने दिले आहेत. यासंदर्भात बुधवारी नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या.