NIA ची दिल्ली सह अनेक राज्यांमध्ये छापेमारी; दहशतवाद्यांचे अंडरवर्ल्डशी असलेले कनेक्शन आले समोर

NIA ची दिल्ली सह अनेक राज्यांमध्ये छापेमारी; दहशतवाद्यांचे अंडरवर्ल्डशी असलेले कनेक्शन आले समोर

Published on

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) दिल्ली-एनसीआर, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमधील २० ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यावेळी दहशतवाद्यांचे अंडरवर्ल्डशी असलेले कनेक्शनही समोर आले आहे. लॉरेन्स बिष्णोई, नीरज बावना आणि टिल्लू ताजपुरिया यांच्यासह सहा गँगस्टर्सची चौकशी करण्यात आल्यानंतर हे छापे टाकले जात आहेत.(NIA conducts raids in Punjab Haryana Delhi as crackdown on gangster terrorist nexus)

भारतात आणि परदेशातील दहशतवादी, गँगस्टर्सआणि अंमली पदार्थांचे तस्कर यांच्यातील वाढत्या संबंधाचा पर्दाफाश करण्याच्या उद्देशाने, एनआयएने दिल्लीसह चार राज्यांतील सहाहून अधिक जिल्ह्यांमध्ये छापे टाकले. गँगस्टर्सशी निगडीत निवासी आणि इतर ठिकाणी एनआयएचे छापे टाकले जात आहेत.

हेही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

सूत्रांच्या माहितीनुसार, गँगस्टर्सचे इतर देशांमध्येही संपर्क आहेत. लॉरेन्स बिष्णोई आणि बावना गँगच्या नावे भारतात दहशतवादासाठी मोठ्या प्रमाणात निधी पुरवला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

NIA ची दिल्ली सह अनेक राज्यांमध्ये छापेमारी; दहशतवाद्यांचे अंडरवर्ल्डशी असलेले कनेक्शन आले समोर
Bhujbal statement: भुजबळांच्या वादग्रस्त विधानानंतर रोहित पवार म्हणाले...

तसेच एनआयएने आतापर्यंत अटक केलेल्या सर्व गँगस्टर्सच्या चौकशीच्या आधारे पाकिस्तान-आयएसआय आणि गँगस्टर्सच्या संबंधांची माहिती जमा केली आहे. देशविरोधी कारवायांसाठी या गँगस्टर्सचा कशाप्रकारे वापर केला जात आहे, याची माहिती तपास यंत्रणा जमा करत आहे. गँगस्टर-दहशतवाद फंडिंग प्रकरणी आतापर्यंत दोन वेळा छापे टाकण्यात आले आहेत. याआधी एनआयएने दोन वेळा कारवाई करत १०२ ठिकाणी छापे टाकले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com