Bhujbal statement: भुजबळांच्या वादग्रस्त विधानानंतर रोहित पवार म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा देवी सरस्वतीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे
Bhujbal statement
Bhujbal statementesakal

राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा देवी सरस्वतीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सरस्वती देवीने किती शाळा काढल्या? असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. पण, राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी भुजबळ यांना चांगलेच सुनावले. (NCP Rohit Pawar Chhagan Bhujbal controversy statement How many schools did Saraswati open )

भुजबळ यांनी याआधी मंदिरांमध्ये सरस्वतीऐवजी सावित्रीबाईंचा फोटा का नाही, असा प्रश्न भुजबळांनी केला होता. त्यानंतर आता सरस्वतीनं किती शाळा काढल्या, असं म्हणत सरस्वतीऐवजी फुले-सावित्रीबाई-शाहू-आंबेडकरंची पूजा करा असं म्हटलं आहे.

भुजबळ यांच्या या वक्तव्याचा रोहित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला.

काय म्हणाले रोहित पवार ?

कोणत्याही देव देवतांचा अपमान होणार नाही. याची काळजी सगळेच घेत असतात. पण त्यांनी केलेलं विधान मी ऐकलेलं नाही. त्यांनी कोणत्या उद्देशाने बोलले माहिती नाही. पण देव देवता, थोर व्यक्ती, धार्मिक अध्यात्मिक हे सर्व गुरू होते. त्यांच्या विरोधात कोणीही बोललं नाही पाहिजे. बोलताना सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. अशा शब्दात त्यांनी भुजबळ यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

Bhujbal statement
Uddhav Thackrey: ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी आमदार शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात

काय म्हणाले नेमकं भुजबळ?

पुण्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महात्मा फुले समता पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात भुजबळ बोलत होते.

'ज्यांनी १५० वर्षांपूर्वी महिलांच्या शिक्षणाचा पुरस्कार केला त्यांची पूजा करा. कर्मवीर भाऊराव पाटील यांची पूजा करा. आज लाखो लोक शिकून मोठे होत आहेत. अण्णासाहेब कर्वे यांची पूजा करा. देवी सरस्वती कुठून आली? सरस्वती देवीने किती शाळा काढल्या? सरस्वती देवीने किती लोकांना शिकवले?

सरस्वतींनी जर शिक्षण दिले असे आपण मानतो तर मग महात्मा फुल्यांना हे पाऊल का उचलावे लागले?, फुल्यांच्या अगोदर शिक्षण सर्व समाजाला का मिळाले नाही? ब्राह्मण समाजातील महिलांनाही का मग शिक्षण मिळत नव्हते?, असे एकावर एक सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com