

vijay sakhare
esakal
दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ घडलेल्या कार स्फोटाच्या तपासाला आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गती दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय बैठकीनंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले असून, विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.
या पथकाचे नेतृत्व नागपूरचे मूळ रहिवासी असलेले मराठमोळे आयपीएस अधिकारी विजय साखरे करणार आहेत. साखरे हे सध्या एनआयएचे अतिरिक्त महासंचालक (एडीजी) म्हणून कार्यरत असून, त्यांच्या नेतृत्वाखालील 'स्पेशल १०' पथक या स्फोटाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.