esakal | NIA अ‍ॅक्शन मोडमध्ये, काश्मीर, दिल्ली, यूपीमध्ये १८ ठिकाणी मारले छापे
sakal

बोलून बातमी शोधा

NIA अ‍ॅक्शन मोडमध्ये, काश्मीर, दिल्ली, यूपीमध्ये १८ ठिकाणी छापे

NIA अ‍ॅक्शन मोडमध्ये, काश्मीर, दिल्ली, यूपीमध्ये १८ ठिकाणी छापे

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) दिल्ली एनसीआर, उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील १८ ठिकाणांवर मंगळवारी छापेमारीची कारवाई केली. काश्मीरमध्ये (Kashmir) गालबग काकापोरा येथे राहणारे एबी खालिक दार यांचा मुलगा ओवेस अहमद दार याच्या घरावर एनआयएने छापा मारला. काश्मीरमध्ये निर्दोष, निष्पाप नागरिकांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी एनआयएने जोरदार कारवाई सुरु केली आहे.

दहशतवादी संघटनांचे जाळे मोडून काढण्यासाठी एनआयए कारवाई करताना मध्य काश्मीरमधील ठिकाणांना लक्ष्य करत आहे. लष्कर-ए-तयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन, अल बदर आणि अन्य दहशतवादी संघटनांशी संबंधित असलेल्या व्यक्ती एनआयएच्या रडारवर आहेत.

हेही वाचा: RCBचं कर्णधारपद सोडल्यानंतर विराट झाला भावूक, म्हणाला

सोमवारी सुरक्षा पथकांबरोबर झालेल्या एन्काऊंटरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा झाला. मृत दहशतवाद्याची ओळख पटली आहे. इम्तियाज अहमद दार असे या दहशतवाद्याचे नाव आहे. तो द रेसिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. टीआरएफ लष्कर-ए-तयबासाठी काम करते. बांदीपोरा येथे नुकतीच एका नागरिकांची हत्या करण्यात आली. त्यामध्ये दार सहभागी होता.

loading image
go to top