esakal | IPL 2021: RCBचं कर्णधारपद सोडल्यानंतर विराट झाला भावूक, म्हणाला...
sakal

बोलून बातमी शोधा

Virat-Kohli-Emotional

विराटच्या बंगळुरूचा कोलकाताने केला पराभव

RCBचं कर्णधारपद सोडल्यानंतर विराट झाला भावूक, म्हणाला

sakal_logo
By
विराज भागवत

"मी RCB चा कर्णधार असताना संघात एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला, ज्या वातावरणात युवा खेळाडूंना स्वतःवर विश्वास वाटेल आणि ते पुढाकार घेऊन संघासाठी उपयुक्त अशी कामगिरी करतील. टीम इंडियामध्येही मी अशाच प्रकारची संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. मी कर्णधार म्हणून RCB साठी सर्वस्व दिलं. माझ्या कामगिरीबाबत लोक काय म्हणतील हे मला माहिती नाही, पण मी मात्र प्रत्येक वर्षी १२०% चांगला प्रयत्न केला आणि त्याचे मला समाधान आहे", असं RCBचा कर्णधार विराट कोहली सामना संपल्यानंतर बोलताना म्हणाला. यावेळी विराट थोडासा भावनिक झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा: 'ग्लॅमरस IPL' ... मॅचपेक्षाही 'या' तरूणींच्या अदांचीच चर्चा!

विराटच्या नेतृत्वाखाली बंगळुरूचा संघ कोलकाताशी पराभूत झाला. त्यामुळे विराटचा हा कर्णधार म्हणून शेवटचा IPL सामना ठरला. यापुढे विराट IPL खेळणार असला तरी तो बंगळुरू संघाचा कर्णधार नसेल. याचबद्दल बोलताना विराट पुढे म्हणाला, "मी कर्णधारपद सोडलं असलं तरी मी माझ्या संघासाठी येथून पुढे एक खेळाडू म्हणून सर्वकाही पणाला लावेन. आता होणाऱ्या मेगा लिलावानंतर पुन्हा एकदा ३ वर्षांसाठी अनेक खेळाडूंसोबत एकत्र खेळण्याची संधी मला मिळेल याचा मला आनंद आहे. नवीन खेळाडू संघात आले तर ते खेळाडू संघात रुजवलेली संस्कृती पुढे नेतील आणि संघाला नव्या उंचीवर पोहोचवतील अशी मला आशा आहे."

हेही वाचा: Video : विराट कॅप्टन्सीचा शेवट पराभवासह पंचासोबतच्या वादानं

पुढच्या वर्षीही RCB कडूनच खेळणार का? या प्रश्नाला उत्तर देताना कोहलीने सूचक वक्तव्य केले. "मी IPL च्या सुरुवातीपासून फक्त RCB संघासाठीच खेळलो आहे. त्यामुळे दुसऱ्या एखाद्या संघाच्या जर्सीमध्ये खेळणं मला पटेल असं वाटत नाही. माझ्यासाठी एखाद्या संघप्रति असलेले प्रेम आणि आपुलकी ही गोष्ट अधिक महत्वाची आहे. पैसे आणि इतर गोष्टींपेक्षाही मला या गोष्टी आधी महत्वाच्या वाटतात. RCB ने इतक्या वर्षे माझ्यावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे जोपर्यंत मी IPL खेळत असेन तोपर्यंत मी याच संघाकडून खेळण्याचा प्रयत्न करेन", असं स्पष्ट उत्तर विराटने दिलं.

loading image
go to top