राज्यात एनआयएचे 11 ठिकाणी छापे; 'इसिस'चे नेटवर्क उद्‍ध्वस्त, बंगळुरात सात किलो सोडियम नायट्रेट जप्त

राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) देशभरात छापे वाढवले आहेत.
NIA Raids
NIA Raidsesakal
Summary

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज राजधानी दिल्लीसह कर्नाटक, महाराष्ट्र आणि झारखंड या तीन राज्यांमध्ये १९ ठिकाणांवर छापे घालत आठजणांना अटक केली.

बंगळूर : राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) देशभरात छापे वाढवले आहेत. काही दिवसांपूर्वी बंगळूरसह महाराष्ट्रात ४४ ठिकाणी छापे टाकणाऱ्या एनआयएने या आठवड्याच्या सुरुवातीला छापासत्र सुरूच ठेवले आहे. काल (ता. १८) एनआयएने कर्नाटकातील (Karnataka) ११ ठिकाणासह चार राज्यांतील १९ ठिकाणी छापे टाकले.

छाप्यादरम्यान, बंगळुरात स्फोटके बनवण्यासाठी वापरले जाणारे सात किलो सोडियम नायट्रेट सापडले. इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया अँड इराक (इसिस) नेटवर्कशी संबंधित माहितीच्या आधारे कट्टरपंथी जिहादी नेटवर्कला दणका देण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

NIA Raids
मोठी बातमी! दारू पिऊन झिंगत असतानाच पोलिसांचा डॉक्टरांच्या हायप्रोफाईल पार्टीवर छापा; चार नर्तिकांसह 13 जणांवर कारवाई

कर्नाटकात केंद्रीय दहशतवादविरोधी दलाने बंगळूर आणि बळ्ळारी येथे काही ठिकाणी छापे टाकून झडती घेतली आहे. झारखंडमधील चार ठिकाणी, महाराष्ट्रातील तीन ठिकाणी आणि दिल्लीतील एका ठिकाणी छापे टाकण्यात आले असून त्यादरम्यान बेहिशेबी रक्कम, डिजिटल उपकरणे, संवेदनशील वस्तूंसह अनेक कागदपत्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. या छाप्यात काय सापडले, याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

एनआयए अधिकाऱ्यांनी बंगळूर शहरातील शिवाजीनगर, पुलिकेशीनगर, सुलतान पाळ्य, आरटी नगर, जे. सी. नगरच्या चिन्नाप्पा गार्डन आणि बळ्ळारीतील नऊ ठिकाणांसह बंगळूर शहरात २० हून अधिक ठिकाणी छापे टाकले. त्यानुसार बंगळूरमधील बदरहळ्ळी येथील शमीवुल्ला यांच्या भाड्याच्या घरावर छापा टाकला असता स्फोटके बनवण्यासाठी वापरले जाणारे सात किलो सोडियम नायट्रेट सापडले.एनआयएने संबंधित अनेकांना अटक केली आहे.

NIA Raids
Assembly Elections : '..तोपर्यंत मी निवडणूक लढणार नाही, हा माझा शब्दच आहे'; BJP आमदाराची मोठी घोषणा

भारतातील इसिस नेटवर्कच्या आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, काही परदेशी दहशतवादी देशातील मुस्लिम तरुणांना जिहादी बनवण्याचा आणि त्यांच्या परिसरात दहशतवादी कारवाया करून अस्थिरतेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या आठवड्यात एनआयएने बंगळूरमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. त्या दिवशी संशयित दहशतवादी अली अब्बासला बंगळूरमध्ये अटक केली होती.

लष्कर-ए-तैयबाचा (एलईटी) दहशतवादी आणि जन्मठेपेची शिक्षा झालेल्या टी. नझीर याला काही कैद्यांच्या कट्टरपंथीकरणाशी संबंधित प्रकरणात अटक करण्यात आली होती. नझीर २००८ च्या साखळी बॉम्बस्फोटात सहभागी होता आणि सध्या तो बंगळूर सेंट्रल जेलमध्ये बंद आहे. गेल्या आठवड्यात एनआयएने महाराष्ट्रात ४० ठिकाणी छापे टाकून १५ जणांना अटक केली होती. यापैकी एक अटक करण्यात आलेला आरोपी हा इसिस युनिटचा म्होरक्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

अटक केलेले सात संशयित असे

बंगळूरमधील बदरहळ्ळी येथील शमीमुल्ला, सुफियान बनलेला निखिल, बंदी घातलेल्या पीएफआयच्या बळ्ळारीतील सरचिटणीस सुलेमान, एजाज अहमद, तबरेझ, मुझमिल यांना एनआयए अधिकाऱ्यांनी अटक केल्याची माहिती दिली.

NIA Raids
Maratha Reservation : आरक्षणासाठी दुबईतही मराठ्यांचा एल्गार; मनोज जरांगे-पाटील साधणार Online संवाद

दिल्लीसह महाराष्ट्रात झाडाझडती

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज राजधानी दिल्लीसह कर्नाटक, महाराष्ट्र आणि झारखंड या तीन राज्यांमध्ये १९ ठिकाणांवर छापे घालत आठजणांना अटक केली. कर्नाटकातील बळ्ळारी आणि बंगळूर, महाराष्ट्रातील अमरावती, मुंबई आणि पुणे, झारखंडमधील जमशेदपूर आणि बोकारो आणि दिल्लीमध्ये काल (सोमवार) सकाळीच ही कारवाई केली.

मिनाज ऊर्फ मोहंमद सुलेमान हा या मॉड्यूलचा सूत्रधार असल्याचे समोर आले असून त्याला सहकारी सय्यद समीरसह बळ्ळारीतून ताब्यात घेण्यात आले. अनास इक्बाल शेखला मुंबईतून ताब्यात घेतले. मोहंमद मुनीरूद्दीन, सय्यद समीउल्लाह ऊर्फ सामी आणि मोहंमद मुजम्मील यांना बंगळूरमधून ताब्यात घेतले. शायान रहेमान ऊर्फ हुसैन याला दिल्लीतून आणि मोहंमद शाबाज ऊर्फ झुल्फिकार ऊर्फ गुड्डू याला जमशेदपूरमध्ये पकडले. हे सगळेजण ‘इसीस’च्यावतीने कारवाया करत होते, असे ‘एनआयए’च्या प्रवक्त्याने सांगितले.

स्फोटांकासाठी लागणारा कच्चा माल उदा ः सल्फर, पोटॅशियम नायट्रेट, चारकोल, गनपावडर, साखर आणि इथेनॉल, धारदार शस्त्रे, बेहिशोबी रोकड जप्त केली आहे. काही स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त केली आहेत. स्फोटके बनवून त्यांच्यामाध्यमातून घातपात घडवून आणण्याचा या आरोपींचा विचार होता, असे ‘एनआयए’च्या प्रवक्त्याने सांगितले.

NIA Raids
Maratha Reservation : मराठा समाजाला घाबरूनच राज्यपालांचा 'तो' दौरा अचानक रद्द? नेमकं काय आहे प्रकरण

जिहाद पुकारण्यासाठी या आरोपींनी सगळी तयारी केली. ते विशिष्ट पद्धतीने तयार केलेल्या अॅपच्या माध्यमातून परस्परांच्या संपर्कात होते. विद्यार्थ्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सामावून घेण्याबरोबरच काही चिथावणीखोर साहित्यही त्यांनी यामाध्यमातून परस्परांना पाठविल्याची बाब उघड झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com