Nigeria Abduction Case : नायजेरियातील 137 वर अपहृत मुलांची सुटका; शाळेतून केले होते अपहरण

Latest Marathi News : ३०० नायजेरियन मुलांपैकी किमान १३७ मुलांची रविवारी (ता. २४) सुटका करण्यात आली, असे पश्चिम आफ्रिकन देशाच्या लष्कराने सांगितले
Nigeria Abduction Case
Nigeria Abduction Caseesakal

अबुजा : नायजेरियाच्या वायव्येकडील कडुना राज्यातील एका शाळेतून दोन आठवड्यांपूर्वी अपहरण (Nigeria Abduction Case) केलेल्या सुमारे ३०० नायजेरियन मुलांपैकी किमान १३७ मुलांची रविवारी (ता. २४) सुटका करण्यात आली, असे पश्चिम आफ्रिकन देशाच्या लष्कराने सांगितले. (Nigeria Abduction Case Rescue of 137 Kidnapped Children school)

दुचाकीवरून आलेल्या बंदूकधाऱ्यांनी ७ मार्चला कुरिगा शाळेवर हल्ला चढवून सुरक्षा दल येण्यापूर्वी मुलांचे अपहरण करून त्यांना जंगलात नेले होते. शाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की हल्ल्यादरम्यान एकूण २८७ विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले होते, त्यापैकी किमान १०० विद्यार्थी १२ किंवा त्यापेक्षा कमी वयाचे आहेत.

बोर्नो राज्यातील चिबोक गावातून बोको हरामच्या अतिरेक्यांनी शेकडो शाळकरी मुलींना ताब्यात घेतल्यावर २०१४ पासून नायजेरियन शाळांमधून किमान एक हजार ४०० विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले आहे. अलीकडच्या वर्षांत देशाच्या वायव्य आणि मध्य प्रदेशात अपहरणासाठी लक्ष केंद्रित केले गेले. याठिकाणी डझनभर सशस्त्र गट अनेकदा खंडणीसाठी गावकरी आणि प्रवाशांना लक्ष्य करतात.

झाम्फारा राज्यातील, त्यांच्या शाळेपासून २०० किलोमीटरहून अधिक दूर असलेल्या व अपहरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या एन्क्लेव्हमध्ये या मुलांना नेण्यात आले होते, असे नायजेरियन लष्करी प्रवक्ते मेजर जनरल एडवर्ड बुबा यांनी एका निवेदनात सांगितले. इतर ओलिस सापडेपर्यंत आणि दहशतवाद्यांना नायजेरियन कायद्याद्वारे अटक, खटला आणि न्याय मिळवून देईपर्यंत प्रयत्न सुरूच राहतील, असे बुबा यांनी सांगितले.

सोकोटो राज्य सरकारने शनिवारी जारी केलेल्या निवेदनानुसार उत्तर सोकोटो राज्यातील किमान १७ इतर शाळकरी मुलांचीही दोन आठवड्यांनंतर सुटका करण्यात आली. कडुना राज्याचे गव्हर्नर उबा सानी यांनी प्रथम बचावाची घोषणा केली, त्यांनी ऑपरेशनबद्दल तपशील दिलेला नाही. सुटका झालेल्यांच्या संख्येतील तफावत स्पष्ट करण्यासाठी रविवारी त्यांच्या कार्यालयात पोहोचता आले नाही.  (latest marathi news)

Nigeria Abduction Case
Latur News : पोलिस पाटलांच्या खांद्यावर अतिरिक्त ओझे ; लातूर जिल्ह्यात ४०० वर गावांत नियुक्तीच नसल्याचा परिणाम

उत्तर नायजेरियातील सामूहिक अपहरण संपविण्याच्या वाढत्या दबावाखाली, राष्ट्राध्यक्ष बोला टिनुबू यांनी आश्वासन दिले, की त्यांचे प्रशासन आमच्या शाळा शिकण्याचे सुरक्षित अभयारण्य राहतील, याची खात्री करण्यासाठी तपशीलवार धोरणे तैनात करीत आहे, अपहरणासाठी जागा नाही.

टिनुबू यांनी खंडणी म्हणून एक पैसाही न देता मुलांना सोडविण्याची शपथ घेतली होती; परंतु अपहरणासाठी खंडणी दिली जाते, बहुतेकदा कुटुंबांद्वारे व्यवस्था केली जाते आणि नायजेरियातील अधिकाऱ्यांनी देयके स्वीकारणे दुर्मिळ आहे.

कडूना अपहरणाची जबाबदारी कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही, ज्याला स्थानिकांनी द्वंद्वग्रस्त उत्तरेकडील प्रदेशात सामूहिक हत्या आणि खंडणी व अपहरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या डाकू गटांना दोष दिला आहे, त्यापैकी बहुतेक पूर्वीचे पशुपालक स्थायिक समुदायांशी संघर्ष करीत आहेत. नायजेरियाच्या वायव्येकडील सुरक्षा संकटाची विस्तृत माहिती असलेल्या दोघांनी ‘एपी’ला सांगितले, की अपहरणकर्त्यांची ओळख समजली आहे.==

Nigeria Abduction Case
Nagpur Police: देशभर फिरून घेतला ६४ बेपत्ता व्यक्तींचा शोध, खाकीतल्या देवमाणसामुळे कुटुंबांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com