बिहारमध्ये रात्रीचा कर्फ्यू, मंदिरं बंद, सिनेमागृहांनाही कुलूप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

janta curfew coronavirus

बिहारमध्ये रात्रीचा कर्फ्यू, मंदिरं बंद, सिनेमागृहांनाही कुलूप

पटणा : बिहारमध्ये वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे (New Corona Guidelines In Bihar) राज्य सरकारने राज्यात रात्रीचा कर्फ्यू (Night Curfew In Bihar) आणि भाविकांसाठी मंदिरे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय सिनेमा हॉल, जिम, पार्क, क्लब, स्टेडियम आणि स्विमिंग पूल पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. नवीन आदेशानुसार बिहारमध्ये रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. (New Guide lines Imposed In Bihar )

हेही वाचा: मुंबईत मिनी lockdown? महापौरांचे संकेत

रेस्टॉरंट, ढाबे केवळ 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, विवाह सोहळ्याला जास्तीत जास्त 50 व्यक्ती आणि अंत्यसंस्काराला जास्तीत जास्त 20 व्यक्तींना उपस्थिती लावता येणार आहे. सर्व राजकीय, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त 50 लोकांना परवानगी देण्यासोबतच इयत्ता 9 ते12 चे वर्ग आणि महाविद्यालये 50% उपस्थितीसह सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर प्राथमिक ते आठवीपर्यंतचे सर्व वर्ग ऑनलाइन चालविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा: राज्यात आज 18,466 नवे रूग्ण; 75 ओमिक्रॉन बाधितांची नोंद

याशिवाय सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालये 50% उपस्थितीने कार्यरत राहणार (Corona Cases In Bihar) आहेत. राजधानी पटणामध्ये सर्वाधिक 565 रूग्ण नोंदवली गेली आहेत. दरम्यान, नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी सामाजिक सुधारणा अभियान दौरा आणि त्यांचा साप्ताहिक जनता दरबार कार्यक्रम 21 जानेवारीपर्यंत पुढे ढकलल्याचीही माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. देशातील वाढत्या रूग्णसंख्येमुळे देशातील इतर राज्यांमध्येदेखील करोना निर्बंध कडक करण्यात आले असून राजधानी दिल्लीत विकेंड लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top