राज्यात आज 18,466 नवे रूग्ण; 75 ओमिक्रॉन बाधितांची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona news

राज्यात आज 18,466 नवे रूग्ण; 75 ओमिक्रॉन बाधितांची नोंद

मुंबई : राज्यात दिवसेंदिलस होणाऱ्या कोरोना (Maharashtra Corona Active Cases ) रूग्णांच्या संख्येमुळे प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली असून आज राज्यात 18,466 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 4558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या राज्यात 66,308 अ‍ॅक्टिव्ह कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, राज्यातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या देखील वाढत असून ही आकडेवारी आता 653 वर गेली असून यातील 259 जणांनी ओमिक्रॉनवर मात केली आहे.

हेही वाचा: ओमिक्रॉनचं संकट: पुण्यात लॉकडाऊन? अजितदादांनी दिलं उत्तर

आज 75 ओमिक्रॉन बाधितांची नोंद

आज राज्यात 75 नव्या ओमिक्रोन बाधितांची नोंद करण्यात आली असून यामध्ये मुंबईत - 40, ठाणे 09, पुणे 08, पनवेल 05, नागपूर आणि कोल्हापूर प्रत्येकी 03, पिपरी चिंचवड 02 तर, भिवंडी, उल्हासनगर, सातारा, अमरावती आणि नवी मुंबईत प्रत्येकी एका ओमिक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला असून सध्या राज्यात 66 हजार 308 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.86 टक्के आहे. सध्या राज्यात 3 लाख 98 हजार 391 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर, 1,110 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. (Maharashtra Record 18,466 New Corona Cases Today)

आज मुंबईमध्ये (Mumbai ) 10 हजार 860 रुग्ण सापडले आहेत. मुंबईमध्ये रुग्णसंख्येने 10 हजारांचा टप्पा गाठला आहे. तर आज 2 जणांचा मृत्यू झाला आहे. कालच बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी घोषित केलं होतं की, वीस हजार रुग्णांचा टप्पा गाठल्यास लॉकडाऊन लागू करण्यात येईल. त्यांच्या या घोषणेनंतरच्या दुसऱ्याच दिवशी दहा हजार रुग्णांचा टप्पा मुंबईने गाठला आहे. दुसरीकडे आता हळूहळू देशातील इतर शहरातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता कडक निर्बंध लागू करण्यास सुरुवात झाली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top