मोदींच्या फिरोजपूर रॅलीला नऊ शेतकरी संघटनांचा विरोध

पंतप्रधानांच्या दौऱ्यात ‘मोदी गो बॅक’ बॅनर लावण्याची धमकीही शेतकरी संघटनांनी दिली आहे.
नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी

चंदीगढ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 5 जानेवारी रोजी फिरोजपूर (Modi Rally In Firozepur) येथील रॅलीला नऊ शेतकरी संघटनांनी (Farmer Union) विरोध दर्शविला आहे. यापार्श्वभूमीवर राज्यभरात विविध ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, पंतप्रधानांच्या दौऱ्यात ‘मोदी गो बॅक’ बॅनर लावण्याची धमकीही शेतकरी संघटनांनी दिली आहे. केंद्र सरकारने त्यांच्या तीन प्रमुख मागण्या मान्य न केल्याने या रॅलीला विरोध करण्यात येत असल्याचे युनियन नेत्यांचे म्हणणे आहे. (Nine Farmer Unions Protest Against PM Modi Rally At Ferozepur)

नरेंद्र मोदी
महाविद्यालयांबाबत उदय सामंतांनी दिली महत्त्वाची माहिती

शेतकरी संघटना काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सांगण्यावरून पंतप्रधानांच्या रॅलीला विरोध करत असल्याचे मत भाजप खासदार दुष्यंत कुमार गौतम यांनी व्यक्त केले आहे. "पंतप्रधान पंजाबसाठी मोठ्या घोषणा करत आहेत, परंतु विरोधी पक्ष निराधार मुद्द्यांसह भाजपला विरोध करण्यासाठी कारणे शोधण्याचा प्रयत्न करीत असल्याचेदेखील गौतम म्हणाले. दरम्यान, शेतकरी संघटनांनी दिलेल्या निषेधाची हाक लक्षात घेऊन रॅलीच्या परिसरात आणि परिसरात (High Security ) सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. (Modi Go Back Banners During visit.)

नरेंद्र मोदी
राज्याचं कोरोनाबाबतचं काम संथगतीनं; गती वाढवावी: केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार

मोदींच्या या रॅलीला किसान मजदूर संघर्ष समिती, क्रांतिकारी किसान युनियन, आझाद किसान समिती दोआबा, जय किसान आंदोलन, बीकेयू सिद्धूपूर, किसान संघर्ष समिती (कोटबुधा), लोक भलाई वेलफेअर सोसायटी, बीकेयू क्रांतीकारी आणि दस्युया समितीसह नऊ शेतकरी संघटनांनी विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. (Panjab Assembly Election 2022)

नरेंद्र मोदी
काँग्रेसच्या मॅरेथॉनमध्ये चेंगराचेंगरी? नेते म्हणतात 'हा तर...'

शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय

शेतकरी आंदोलनादरम्यान (Farmers Agitation ) मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक कुटुंबाला 1 कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान, अटक केलेल्या शेतकऱ्यांची सुटका आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांची हकालपट्टी या मागण्या शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत. मात्र, केंद्राकडून अद्याप यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्याशिवाय इतर मागण्यांमध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हरियाणातील शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले हत्येचे गुन्हे देखील मागे घेण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे. (Farmers Demands To Central Government )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com