राज्याचं कोरोनाबाबतचं काम संथगतीनं; गती वाढवावी; केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांचा सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्याचं कोरोनाबाबतचं काम संथगतीनं; गती वाढवावी: केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार

राज्याचं कोरोनाबाबतचं काम संथगतीनं; गती वाढवावी: केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार

मुंबई: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार आज मुंबईत होत्या. भारती पवार यांनी आज मुंबईमध्ये कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली आहे. आज दुपारी १२ वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडणार बैठक पार पडली आहे. मुंबईबरोबर राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून बिघडत चाललेल्या परिस्थितीवर केंद्राचीही नजर आहे. या संदर्भातील बैठकीनंतर त्यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीबाबत भाष्य केलंय. त्यांनी म्हटलंय की, राज्यातील सध्याचं काम हे संथगतीने सुरु आहे. राज्य सरकारला विनंती आहे की, त्यांनी आपल्या कामाची गती वाढवावी.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार की घटणार? लवकरच मोठा निर्णय

पुढे त्यांनी म्हटलंय की, प्रत्येक राज्यावर केंद्राचं लक्ष आहे. महाराष्ट्रात आठवड्याभरात कोरोनाची संख्या वाढली आहे. केंद्राने सर्व राज्यांना नियमावली दिली आहे. मुंबईत वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असून वेळीच पावलं उचलली गेली पाहिजेत. कोरोना लशीचा पुरेसा पुरवठा देखील केंद्राने केला आहे.

हेही वाचा: भारतानं चीनला दिलं सडेतोड प्रत्युत्तर; गलवानमध्ये फडकावला तिरंगा

काळजी घेतली तर कोरोनाचा हा प्रसार रोखता येऊ शकतो. केरळसारख्या राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्यातील काम संथगतीने सुरु आहे. राज्यसरकारला विनंती आहे की त्यांनी कामाची गती वाढवावी. बारीकसारीक गोष्टी लक्षात घेऊन हेल्थ बजेट दिलं गेलंय. केंद्राने आपली जबाबदारी पार पाडलीय, मग राज्य सरकारच्या या तक्रारी योग्य नाहीत,असंही त्यांनी म्हटलंय.

Web Title: The Maharashtra State Work On Corona Has Been Slow Speed Up Advice From Union Minister Of State Bharti Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top