नऊ महिन्यांच्या मुलीला चुलता घेऊन गेला अन्...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

नऊ महिन्यांच्या चिमुकलीवर चुलत्याने बलात्कार केल्याची घटना बरग्राम पंचायतीमध्ये घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. अनुप प्रामाणिक याला अटक करण्यात आली आहे.

हावडा (पश्चिम बंगाल): नऊ महिन्यांच्या चिमुकलीवर चुलत्याने बलात्कार केल्याची घटना बरग्राम पंचायतीमध्ये घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. अनुप प्रामाणिक याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुप हा पीडित मुलीच्या घराशेजारीच राहतो. मुलीला खेळणी घेण्याबरोबरच घरामध्ये खेळायला घेऊन जातो म्हणून तो घेऊन गेला. काही वेळानंतर त्याने पुन्हा मुलीला तिच्या पालकांकडे आणून दिले. परंतु, यावेळी मुलगी जोरजोरात रडत होती. शिवाय, रक्तबंबाळ झाली होती. मुलीचे रडणे थांबत नव्हते म्हणून त्यांनी रुग्णालयात धाव घेतली व पोलिसांकडे तक्रार दाखल केली. मुलीवर बलात्कार केल्याची कबुली अनुपने दिली असून, त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती गंभीर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nine month old girl raped by uncle at west bengal