नऊ राज्यांत कोंबड्यांना बर्ड फ्लू

वृत्तसंस्था
Monday, 25 January 2021

कावळे व इतर पक्षांमुळे मध्य प्रदेश, हरियाना, महाराष्ट्र, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, राजस्थान, जम्मू-काश्मीर आणि पंजाब येथे संसर्गाची नोंद झाली.

नवी दिल्ली - देशातील नऊ राज्यांत कोंबड्यांमुळे, तर १२ राज्यांत कावळे, स्थलांतरित व अन्य जंगली पक्षांमुळे बर्ड फ्लूची नोंद झाली आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पशुसंवर्धन खात्याकडून ही माहिती देण्यात आली, जी २४ जानेवारीपर्यंत अद्ययावत करण्यात आली आहे. कोंबड्यांमुळे केरळ, हरियाना, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तराखंड, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पंजाब या राज्यांत संसर्ग आहे, कावळे व इतर पक्षांमुळे मध्य प्रदेश, हरियाना, महाराष्ट्र, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, राजस्थान, जम्मू-काश्मीर आणि पंजाब येथे संसर्गाची नोंद झाली.

कबुतरांमध्ये बर्ड फ्लू संसर्गाची नोंद झाली नसून उत्तराखंडमधील टिहरी आणि पौखाल वनक्षेत्रातील रंगीत पिसांच्या पक्ष्यांमध्येही संसर्ग नाही.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संसर्गाचा उद्रेक झालेल्या केरळमधील एक, मध्य प्रदेशातील तीन, तर महाराष्ट्रातील पाच केंद्रांवर कार्यवाहीनंतरचे देखरेख योजनेचे दिशानिर्देश देण्यात आले.

भरपाई मिळणार
या निवेदनानुसार सरकारने पोल्ट्रीतील कोंबड्यांचे शिरकाण केले किंवा अंडी व खाद्य नष्ट केले तर संबंधित शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल. याचा केंद्रीय खाते राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या साथीत निम्मा भार उचलते.

यवतमाळचा समावेश
यवतमाळ जिल्ह्यातील सावरगड आणि उजोना दारव्हा येथील पोल्ट्रीतील कोंबड्यांचे नमुने आणि दिल्लीतील जामिया हमदर्द विद्यापीठातील कावळ्यांचे नमुने तपासणीत संसर्गग्रस्त आढळून आले.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine states chicken bird flu