Nipani Crime Update
esakal
निपाणी (बेळगाव) : शहराबाहेरील अष्टविनायक नगरातील बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल २२ तोळ्यांच्या दागिन्यांची चोरी (Nipani Crime Update) केली. बंद घराला लक्ष्य करून चोरट्यांनी चांदीच्या दागिन्यांसह रोख २५ हजार रुपये पळविले. बुधवारी (ता. २६) दुपारी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे उपनगरांत भीतीचे वातावरण पसरले आहे. राजू कृष्णा घाटगे असे चोरी झालेल्या घर मालकाचे नाव आहे.