Belagav District Bank-Election
esakal
निपाणी : बेळगाव जिल्हा बँकेच्या संचालक मंडळासाठी निवडणूक (Belagav District Bank-Election) होणार आहे. पक्षनिरपेक्षपणे अनेक नेते एकमेकांना मदत करत आहेत. भाजप नेते काँग्रेसला व काँग्रेस नेते भाजपला मदत करत असल्याचे चित्र दिसत असताना निपाणी तालुक्यातून पहिल्यांदा होणाऱ्या संचालकपदासाठी निवडणूक लागण्याची शक्यता आहे. अण्णासाहेब जोल्ले (Annasaheb Jolle) यांची तयारी पूर्ण झाली असतानाच आता उत्तम पाटीलही रिंगणात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.