नीरजकुमारसिंह बबलू
नीरजकुमारसिंह बबलूsakal

‘रामायण आणि महाभारत अभ्यासक्रमात समावेश करा’- नीरजकुमारसिंह बबलू

रामायण, महाभारत महाकाव्यांचा समावेश करावा अशी मागणी बिहारमधील भाजपचे मंत्री नीरजकुमारसिंह बबलू यांनी केली.
Published on

पाटणा : शालेय, महाविद्यालयीन अभ्यासक्रमांत रामायण, महाभारत महाकाव्यांचा समावेश करावा अशी मागणी बिहारमधील भाजपचे मंत्री नीरजकुमारसिंह बबलू यांनी केली.

भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यास पाठिंबा दर्शविला आहे. बबलू यांनी सांगितले की, या निर्णयामुळे तरुण पिढीत देशाचा इतिहास आणि संस्कृतीबद्दल जागरूकता निर्माण होईल. धार्मिक पुस्तके वाचण्याकडे लोकांचा कल असतो. त्यामुळे रामायण, महाभारताचा अभ्यासक्रमात समावेश झाल्यास मुलांना फायदा होईल. भाजपचे प्रतिनिधित्व करणारे आरोग्य मंत्री मंगल पांडे यांनी सांगितले की, तरुण पिढीला देशाची परंपरा आणि संस्कृतीची माहिती देण्याची गरज आहे. मी काही शिक्षण मंत्री नाही, पण ही माहिती प्रत्येकाला असलीच पाहिजे. प्रत्येकाच्या घरात महाभारत आणि गीता असते, जो आपल्या देशाचा इतिहास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com