Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती
PNB Fraud: फरार हिरे व्यापारी नीरव मोदीने वेस्टमिन्स्टर न्यायालयात प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करण्याची याचिका दाखल केली आहे. भारतात पाठवल्यास त्याच्यावर तपास यंत्रणांकडून शारीरिक व मानसिक छळ होऊ शकतो, असा त्याचा दावा आहे.
नवी दिल्ली : फरार हिरे व्यापारी आणि पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहाराचा मुख्य आरोपी नीरव मोदी याने ब्रिटनमधील प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करावा अशी मागणी करत वेस्टमिन्स्टिर न्यायालयात याचिका दाखल केली आहे.