निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशीच; दया याचिका फेटाळली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

दया याचिका राष्ट्रपतींनी तात्काळ फेटाळली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश सिंग याची दया याचिका केंद्रीय गृहमंत्रालायकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवण्यात आली होती. मात्र, ही दया याचिका राष्ट्रपतींनी तात्काळ फेटाळली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राजधानी दिल्लीत 16 डिसेंबर, 2012 मध्ये निर्भया बलात्कार प्रकरण घडले होते. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. यातील दोषींना न्यायालयाकडून फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. मात्र, यातील दोषींनी राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केल्याने आता ही शिक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आता राष्ट्रपतींनी त्यांची दया याचिका फेटाळली आहे.

दरम्यान, राष्ट्रपतींनी यातील दोषींची दया याचिका फेटाळल्याने आता या दोषींना 22 जानेवारीला फाशीची शिक्षा देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

माझ्या मुलीच्या मृत्यूचा राजकीय फायदा घेतला जातोय

मी आतापर्यंत राजकीय चर्चा केली नाही. मात्र, आता सांगू इच्छिते की, ज्या लोकांनी 2012 मध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन केले, तेच लोक आज माझ्या मुलीच्या मृत्यूवर राजकीय फायदा घेण्यासाठी खेळत आहेत, असे आशा देवी यांनी म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirbhaya Case Mercy petition denied by President Ramnath Kovind