फाशीपासून वाचण्यासाठी निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषीची नवी चाल

वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

फाशीपासून वाचण्यासाठी निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषीने आणि वकिलाने नवी चाल खेळली आहे. 

नवी दिल्ली : फाशीपासून वाचण्यासाठी निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषीने आणि वकिलाने नवी चाल खेळली आहे. निर्भया प्रकरणात दोषी असणाऱ्या विनय शर्माने कोठडीत भिंतीवर आपटून आपले डोके फोडले असून तो यामध्ये किरकोळ जखमी झाल्याची तुरुंग अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. यानंतर दोषीच्या वकिलांनी दोषीचे मानसिक संतुलन बिघडले असून त्याची फाशी टाळून त्याला रुग्णालयात दाखल करण्याविषयी याचिका दाखल केली आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दोषीचे वकील ए पी सिंह यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हटले आहे की, दोषीला लवकरात लवकर मानसिक रुग्णांच्या दवाखान्यात दाखल करण्यात यावे. त्यासोबतच त्याची उच्चस्तरीय वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे. विनय शर्मा याने तिहार तुरुंगातील त्याच्या कोठडीतील भिंतीवर डोके आपटून घेतल्याने त्याला किरकोळ जखम झाल्याचा हवालाही वकिलांनी या याचिकेत दिला आहे.

शरद पवारांना समन्स बजवावा

तत्पूर्वी, विनयने फाशी टाळण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. निर्भयाचे मारेकऱ्यांनी फाशीची शिक्षा टाळण्यासाठी आत्तापर्यंत अनेक प्रयत्न केले. मात्र ते असफल ठरल्याने आता नवे मार्ग ते शोधत आहेत. त्यातूनच विनयने रविवारी (ता. १६) दुपारी कोठडीतील भिंतीवर डोके आपटून घेतले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पाहिले आणि त्याचे भिंतीवर डोके आपटणे थांबविले. रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्याला पुन्हा तुरुंगात आणले. ही घटना रविवारी घडली आणि सोमवारी (ता.१७) त्याच्या आईने याबाबत माहिती दिली. त्या दिवशी त्याने आईला ओळखण्यासही नकार दिला होता. डेथ वॉरंट बजावल्यापासून त्याचे मानसिक आरोग्य ढासळले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीस विनयच्या वकिलांनी तो उपोषणास बसला असून त्याची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे दिल्ली न्यायालयात सांगितले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirbhaya Convict Has Head Injury Cant Recognise Mother Claims Lawyer