esakal | शरद पवारांना समन्स बजावावा;भीमा-कोरेगाव प्रकरणी चौकशी आयोगाकडे मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

 Demand for summoned Sharad Pawar to inquiry commission in Bhima-Koregaon case

शरद पवारांना समन्स बजावावा;भीमा-कोरेगाव प्रकरणी चौकशी आयोगाकडे मागणी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे ः ''राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसेबद्दल आणखी माहिती असल्यास ती त्यांनी भीमा-कोरेगाव आयोगासमोर स्वतः येऊन जमा करावी. याबाबत आयोगाने त्यांना समन्स बजावावा,'' अशी मागणी एकणारा अर्ज एका व्यक्तीने भीमा-कोरेगाव चौकशी आयोगाकडे गुरुवारी केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"पवार यांनी 18 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात पोलिस दलाचा ज्या पद्धतीने गैरवापर झाला आहे, त्याची चौकशी करावी,'' अशी मागणी केली होती. तसेच ''मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्‍वभूमीवर एक वेगळे वातावरण तयार केले होते,'' असे पवार त्यात म्हणाले होते. यावरून या घटनेबाबत पवार यांच्याकडे अधिक माहिती असल्याचे दिसते. जी त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे आयोगासमोर सादर केलेली नाही. त्यामुळे न्याय होण्याच्या दृष्टीने आयोगाने पवार यांना समन्स बजावावा व त्यांनी संबंधित माहिती आयोगाकडे जमा करावी, अशी मागणी या अर्जाद्वारे करण्यात आली आहे.

आता पीएमपी राबविणार दर महिन्याला 'बस डे`

सागर शिंदे यांनी हा अर्ज आयोगाकडे सादर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बऱ्याच मतभेदानंतर या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्यास मंजुरी दिली होती. एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव हिंसा ही दोन्ही प्रकरणे वेगळी असून भीमा-कोरेगाव प्रकरण केंद्राकडे देणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यानंतर स्पष्ट केले होते.

आई रागावली म्हणून 12 वर्षीय मुलगी घर सोडून गेली अन् एका आजीने तिला...
चौकशीबाबत राज्य आणि केंद्र सरकारमधील वाद शांत होत नाही तोच पवारांनाच समन्स बजावण्याची मागणी करणारा अर्ज दाखल झाला आहे. आयोगाच्या पुढील तारखेस त्यावर सुनावणी होऊ शकते. शिंदे यांनी भीमा-कोरेगाव हिंसेबाबत एक प्रतिज्ञापत्र यापूर्वी आयोगाकडे सादर केले आहे. "एक जानेवारी 1818 स्वातंत्र्याचा लढा' या पुस्तकात चुकीचा इतिहास मांडण्यात आला आहे. ते पुस्तक घटनेच्या दिवशी विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. त्यामुळे हिंसा निर्माण झाली होती. त्याची चौकशी करणे गरजेचे आहे, असे त्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.


''सागर शिंदे यांचा अर्ज आयोगाकडे दाखल झाला आहे. आयोगाची पुढील सुनावणी 24 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्या दिवशी या अर्जावर सुनावणी होण्याची शक्‍यता आहे.''
- अॅड. आशिष सातपुते, आयोगाचे वकील