esakal | Nirbhaya Case : '...त्यावेळी मी तिथे नव्हतो'; दोषी मुकेशने तोडले अकलेचे तारे!
sakal

बोलून बातमी शोधा

Nirbhaya-Mukesh-Singh

या प्रकरणात दोषी ठरलेल्या चार जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून, २० मार्चला पहाटे ५.३० वाजता त्याची अंमलबजवाणी करण्याचे आदेश आहेत.

Nirbhaya Case : '...त्यावेळी मी तिथे नव्हतो'; दोषी मुकेशने तोडले अकलेचे तारे!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ‘निर्भया’वर बलात्काराची घटना घडली त्या वेळी मी दिल्लीत नव्हतोच, असा दावा करत फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी करणारी दोषी मुकेशसिंहची याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (ता.१७) फेटाळून लावली.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या प्रकरणातील चारही दोषी शिक्षेची अंमलबजावणी टाळण्यासाठी निरनिराळ्या क्लृप्त्या योजत आहेत, अशी टीका सरकारी वकिलांनी न्यायालयात केली.

- न्यायालयाच्या वेळेतही बदल, अतितात्काळ खटलेच चालणार

‘निर्भया’वर १६ डिसेंबर २०१२ ला दिल्लीत धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार झाला होता. मात्र, या दिवशी आपण राजस्थानात होतो आणि पोलिसांनी आपल्याला तेथे पकडून १७ तारखेला दिल्लीत आणले, असा दावा मुकेशसिंहने याचिकेत केला होता.

- Coronavirus : कोरोनाग्रस्त पेशंटना दिला जातोय 'हा' स्पेशल मेन्यू!

तो दावा न्यायालयाने फेटाळून लावतानाच दोषींच्या वकिलांना प्रकरणाचे गांभीर्य समजावून सांगण्याचे आदेश बार कौन्सिलला दिले. या प्रकरणात दोषी ठरलेल्या चार जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून, २० मार्चला पहाटे ५.३० वाजता त्याची अंमलबजवाणी करण्याचे आदेश आहेत.

- Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतला मोठा निर्णय!