Coronavirus : कोरोनाग्रस्त पेशंटना दिला जातोय 'हा' स्पेशल मेन्यू!

वृत्तसंस्था
Tuesday, 17 March 2020

ब्रिटनच्या रुग्णांसाठी सायंकाळी चार वाजता फळांचा रस आणि रात्रीच्या जेवणात टोस्ट ब्रेड, अंडी आणि फळे असा आहार असतो. 

तिरुअनंतपुरम : केरळमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवलेल्या कोरोना व्हायरसच्या १७ संशयित रुग्णांसाठी नाष्टा, दोन वेळचे जेवण आणि वाचनासाठी पुस्तके अशा सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

विलगीकरण कक्षात १५ भारतीय रुग्ण (सर्व केरळचे रहिवासी) आणि दोन ब्रिटनचे नागरिक आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र मेन्यू तयार केला जातो, असे रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश मोहन यांनी सांगितले. भारतीय रुग्णांना सकाळी साडेसात वाजता डोसा- सांबर, दोन अंडी, दोन संत्री, चहा आणि एक लिटर मिनरल पाणी दिले जाते. ब्रिटिश रुग्णांना कांदाविरहित आम्लेट, टोस्ट, सूप आणि फळांचा रस दिला जातो. 

- Corona Effect : रेल्वेने घेतली कोरोनाची धास्ती; 'या' 23 रेल्वेगाड्या रद्द!

भारतीयांना सकाळी साडेदहाच्या सुमारास फळांचा रस देतात. दुपारच्या जेवणात दोन चपात्या, भात, मासे, आमटी, दही असा चौरस आहार असतो. एक लिटर मिनरल पाणीही त्या वेळी देतात. विदेशी रुग्णांसाठी सकाळी अकरा वाजता अननसाचा रस आणि दुपारी बारा वाजता जेवणात टोस्ट चीज (आवश्‍यकता असल्यास) फळे असा आहार असतो. 

- Corona Virus : पुण्यात आणखी एक रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या पोहचली...

केरळच्या रुग्णांना दुपारी साडेतीनला चहा-बिस्कीट, तळलेले केळ आणि वडा असे पदार्थ खाण्यास देतात. सायंकाळी सात वाजता रात्रीच्या जेवणात अप्पम, शिजवलेल्या भाज्या, दोन केळी आणि एक लिटर पाणी असा मेन्यू असतो. ब्रिटनच्या रुग्णांसाठी सायंकाळी चार वाजता फळांचा रस आणि रात्रीच्या जेवणात टोस्ट ब्रेड, अंडी आणि फळे असा आहार असतो. 

- न्यायालयाच्या वेळेतही बदल, अतितात्काळ खटलेच चालणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kerala govt provide Special food and better services to corona virus affected patients